Join us  

हॅपी बर्थडे कंगना

By admin | Published: March 23, 2016 12:00 AM

अभिनयासोबतच कंगनाला लिखाण व दिग्दर्शनातही रस असून तिला भविष्यात चित्रपट दिग्दर्शित करण्याची इच्छा आहे.फॅशन आणि क्वीन या दोन्ही ...

अभिनयासोबतच कंगनाला लिखाण व दिग्दर्शनातही रस असून तिला भविष्यात चित्रपट दिग्दर्शित करण्याची इच्छा आहे.

फॅशन आणि क्वीन या दोन्ही चित्रपटातील अप्रतिम भूमिकांसाठी कंगनाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. २००८ मध्ये तिला फॅशनसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हमून तर २०१४मध्ये क्वीन चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार देण्यात आला.

क्वीनमधल्या आपल्या अभिनयाने सर्वांना स्तिमित करणा-या कंगनाने या चित्रपटासाठी त्यावर्षीचे जवळजवळ सर्व पुरस्कार जिंकले. मात्र या चित्रपटात अभिनय करण्यासोबतच तिने तिच्या भूमिकेसाठी सह-संवाद लेखक म्हणून काम केले होते.

कंगनाला दोन भावंडे आहे रंगोली ही मोठी बहीण आणि अक्षत हा छोटा भाऊ... विशेष म्हणजे तिची बहीण रंगोली हीच तिची मॅनेजर असून तीच तिच्या सर्व असाईनमेंट्स सांभाळते.

कुटुंबियांना मात्र तिचा चित्रपट क्षेत्रात जाण्याचा निर्णय मान्य नव्हता त्यामुळे ती घरच्यांशी भांडून बाहरे पडली. गँगस्टर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कंगनाने नवी दिल्लीतील अस्मिता थिएटर ग्रुपमध्ये दिग्दर्शक अरविंद गौर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

कंगना मूळची हिमाचल प्रदेशमधील.. २३ मार्च १९८७ रोजी तिचा जन्म झाला. आज सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणा-या कंगनाला लहानपणी डॉक्टर व्हयाची इच्छा होती. मात्र ती जसजशी मोठी होत गेली तिला अभिनयाचे क्षेत्र खुणावू लागले.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत हिचा आज (२३ मार्च) वाढदिवस. गँगस्टर तनू वेड्स मनू वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई फॅशन क्वीन अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवणा-या या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!