भारताच्या पहिल्या सुपर मॉडलचा विषय निघाला की, सर्वात पहिलं नाव डोळ्यांसमोर येतं ते मधु सप्रे. मधु सप्रेने न्यूड फोटोशूट करून एकच खळबळ उडवून दिली होती. आज याच मधु सप्रेचा वाढदिवस. या मराठमोळ्या मॉडलची जगभरात ख्याती होती. मधुला एक अॅथलीट व्हायचं होतं पण 1992 मध्ये मिस युनिव्हर्स ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये तिने कांस्य पदक मिळवलं आणि ती मॉडल झाली. चला जाणून घेऊ मधुबाबत काही खास गोष्टी......
1) 90 च्या काळात तरुणांमध्ये बोल्डनेस लोकप्रिय करणाऱ्या मधुश्री सप्रेचा जन्म 14 जुलै 1971 मध्ये नागपूरमध्ये झाला होता. त्यावेळी मधु मॉडलिंग विश्वातील सर्वात मोठं नावं होतं.
2) केवळ 19 वर्षांची असताना मधुला प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी मॉडलिंग करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी तिचं फोटोशूटही केलं होतं.
3) मिलिंग सोमण आणि मधु सप्रे ही जोड़ी त्यावेळी फॅशन विश्वातील सर्वात लोकप्रिय होती. दोघांकडेही सुपरमॉडलचा किताब होता. दोघेही रिलेशनशिपमध्येही होते आणि दोघेही फार स्वतंत्र विचारांचे होते.
4) 1995 मध्ये एका शूज तयार करणाऱ्या फिमिक्स या कंपनीने दोघांना घेऊन एक न्यूड जाहिरात तयार केली होती. या जाहिरातीची गणती आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त जाहिरातींमध्ये होते. मधु आणि मिलिंद या जाहिरातीमध्ये न्यूड झाले होते. दोघांच्या शरीरावर एक अजगर होता.
5) या जाहिरातीमुळे मुंबई पोलिसच्या सोशल सर्व्हिस ब्रॅन्चने मधु आणि मिलिंदवर मुंबई कोर्टात केस दाखल केली होती. ही केस कोर्टा साधारण 14 वर्ष सुरु होती. अखेर 14 वर्षांनी दोघांनाही निर्दोष ठरवलं होतं.
6) मॉडलिंग दरम्यान मधु मिलिंद सोमणसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचं हे नातं जवळपास 5 वर्ष होतं. 90 च्या काळात दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. पण पुढे ते वेगळे झाले.
7) 2001 मध्ये मधुने इटलीच्या एका बिझनेसमनसोबत लग्न केले. लग्नानंतर मधु इटलीच्या रिसिओने शहरात स्थायिक झाली. दोघांना एक मुलगी असून तिचं नाव इंदिरा आहे.