Join us

Prabhas : प्रभासने चाहत्यांना दिलं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट,‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 1:56 PM

Adipurush Second Look Out: आज प्रभास ( Prabhas Birthday) त्याचा वाढदिवस साजरा करतोय आणि याच निमित्ताने त्याच्या ‘आदिपुरूष’ या आगामी सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

Adipurush Second Look Out:  साऊथचा सुपरस्टार प्रभास हा चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. प्रभासला रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आज प्रभास (Prabhas Birthday) त्याचा वाढदिवस साजरा करतोय आणि याच निमित्ताने त्याच्या आगामी सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. होय, प्रभासचा ‘आदिपुरूष’ (Adipurush ) हा सिनेमा येत्या 12 जानेवारी रिलीज होतोय. ‘आदिपुरूष’चा फर्स्ट लुक आणि टीझर तुम्ही पाहिला असेलच. आता या चित्रपटाचं नवं पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये प्रभास हा प्रभू रामचंद्राच्या लुकमध्ये दिसतेय. हातात धनुष्यबाण घेऊन तो उभा आहे आणि त्याच्यामागे वानरसेना दिसतेय.

‘आदिपुरूष’ या चित्रपटात प्रभास रामाची भूमिका साकारतो आहे. क्रिती सॅनन माता सीतेच्या तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाचं पात्र साकारताना दिसणार आहे. ओम राऊत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ओम राऊत यांचा पहिला मराठी सिनेमा ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा रूपेरी पडद्यावर गाजला. पहिल्यावहिल्या सिनेमातल्या दिग्दर्शनानं ओम राऊत यांनी साºयांची मनं जिंकली. त्यानंतर त्यांच्या ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ चित्रपटानं बॉक्स आॅफिसवर नवा इतिहास रचला. आता त्यांचा ‘आदिपुरूष’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

या सिनेमात व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसाही खर्च करण्यात आला. परंतु काही दिवसांपूर्वी ‘आदिपुरूष’ टीझर पाहून नेटिझन्सची निराशा झाली होती. चित्रपटातील सैफ अली खानचा लुक आणि व्हिएफएक्स इफेक्टवरून हा सिनेमा ट्रोल झाला होता. 

अगदी ‘आदिपुरूष’मधील रावणाची  तुलना ‘पद्मावत’ चित्रपटातील खिल्जीशी केली गेली होती.  या निगेटीव्ह फिडबॅकवर  दिग्दर्शक ओम राऊत यांनी चुप्पी तोडत चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नसल्याचं  रेटून सांगितलं होतं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ओम राऊत यांनी उत्तर दिलं होतं. ‘आमच्या चित्रपटात काहीही गैर नाही.  आम्ही काहीही चुकीचं दाखवलेलं नाही. नवीन पिढीपर्यंत श्रीराम यांची गोष्ट, त्यांचे विचार  पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि नवीन पिढीपर्यत प्रभु श्रीराम यांचे विचार पोहोचवायचे असतील तर  आपल्यालाही नवीन टेक्नोलॉजीचा वापर करून चित्रपटाची निर्मिती करणं भागं आहे.  आम्ही चित्रपटात काहीही चुकीचं दाखवलेलं नाही. प्रत्येक गोष्टीचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला आहे,’ असं ओम राऊत म्हणाले होते.

टॅग्स :प्रभासबॉलिवूडसिनेमासैफ अली खान क्रिती सनॉन