सध्या जरी राणी आपल्या संसारात मग्न असली तरी ती चित्रपटांपासून लांब गेलेली नाही. मी मरेपर्यंत चित्रपटांत काम करणं सोडणार नाही असं तिनेच स्पष्ट केले होते.
दोन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी राणी २०१४ साली चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत विवाहबंधनात अडकली. २०१५ साली तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला जिचे नाव आदिरा असे ठेवण्यात आले.
संजय लीला भन्साळीच्या ब्लॅक चित्रपटातील राणीच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. या चित्रपटात तिने एका अंध व बहि-या मुलीची भूमिका उत्कृष्टरित्या निभावली.
२००५ साली तिने फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री असे दोन्ही पुरस्कार जिंकले. एकाच वर्षी हे दोन्ही पुरस्कार जिंकणारी ती पहिली अभिनेत्री ठरली.
राणीसाठी २००४ साल व्यावसायिकदृष्ट्या खूपच यशस्वी ठरले. त्यावर्षी तिने युवा हम-तुम वीर-झारा ब्लॅक बंटी और बबली आणि कभी अलविदा ना केहना यासारखे अनके यशस्वी चित्रपट दिले.
१९९८ सालीच आलेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटातील तिची भूमिकाही खूप गाजली आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पहिला पुरस्कार पटकावला. राणीने २००० साली हे राम या चित्रपटाच्या हिंदी व तामिळ व्हर्जनमध्ये कमल हासनसोबत काम केले. त्यातील तिचे काम खूप नावाजले गेले.
त्यानंतर १९९८ साली तिने आमिर खान सोबत गुलाम चित्रपटात काम केले आणि तिला अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील आती क्या खंडाला है गाणे खूप गाजले.
1996 साली राणीने तिच्या वडिलांच्या बियेर फूल या चित्रपटात छोटी भूमिका केली त्यानंतर अशा अनके चित्रपटांत लहान -मोठ्या भूमिका करत तिने चित्रपटसृष्टीत बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला. १९९७ साली तिने राजा की आएगी बारात या चित्रपटात मुख्य भूमिका करत तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मात्र या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही.
कोलकातामध्ये एका बंगाली कुटुंबात २१ मार्च १९७८ साली राणी मुखर्जीचा जन्म झाला. तिचे वडील राम मुखर्जी हिंदी व बंगाली चित्रपटांचे दिग्दर्शक तर आई कृष्णा मुखर्जी एक प्रसिद्ध पार्श्वगायिका होती. राणीचा मोठा भाऊ राजा हाही चित्रपट दिग्दर्शक आहे. तर प्रख्यात अभिनेत्री काजोल तिची चुलत बहीण असून दिग्दर्शक अयान मुखर्जी हाही तिचा चुलत भाऊ आहे. घरातील सर्वजण या क्षेत्रातील असूनही राणीचा चित्रपटसृष्टीतील प्रवास सोपा नव्हता.
साथिया युवा ब्लॅक मर्दानी नो वन किल्ड जेसिका अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी मोहक हास्याचे वरदान लाभलेली अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा आज (२१ मार्च) वाढदिवस.. वाढदिवसानिमित्त तिला खूप शुभेच्छा...!