Join us

सलमानच्या प्रेमात वेडी होती अभिनेत्री, वेळेत गृहपाठ अन् पॉकेटमनीतून खरेदी करायची पोस्टर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 11:24 IST

एक अभिनेत्री सलमानसाठी वेडी होती आणि तिने त्याचे पोस्टर चक्क तिच्या रूममध्ये देखील लावले होते.

Salman Khan Birthday Special : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आज 27 डिसेंबर 2024 रोजी त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करतोय. या वयातही मुलींना त्याचे वेड आहे. फॅशन आयकॉन सलमान खानची शैली खूप प्रसिद्ध आहे.  त्याच्या लूकपासून ते हेअरस्टाईलपर्यंत सर्वच गोष्टी जबरदस्त असतात. त्याची चालण्याची शैली आणि बोलण्याची लकब इतकी जबरदस्त आहे की आजही तरुणी त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात.

एक तरुणी सलमानसाठी वेडी होती आणि तिने त्याचे पोस्टर चक्क तिच्या रूममध्ये देखील लावले होते. ती आहे  माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen). आज सुष्मिता सेन ही बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने ही अभिनेत्री लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

सुष्मिता सेन हिनं एका मुलाखतीमध्ये किस्सा सांगितला होता.  किशोरवयापासूनच सुष्मिताचं सलमानवर क्रश होतं. 'मैने प्यार किया' रिलीज झाल्यानंतर तर तिला सलमान खूपच जास्त आवडायला लागला होता. शिप्रा नीरजच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सुष्मिता सेनने सांगितलं की, "सलमानचे पोस्टर खरेदी करण्यासाठी सर्व पॉकेटमनी खर्च करायचे. माझे आई-वडील नेहमी म्हणायचे की जर शाळेचा गृहपाठ पूर्ण झाला नाही तर ते खोलीतील सर्व पोस्टर्स काढून टाकतील. त्यामुळे माझी सर्व कामे वेळेवर पूर्ण करत होते. त्यावेळी मी त्याच्या प्रेमात पडलो होतो. माझ्याकडे 'मैंने प्यार किया' चित्रपटातील कबुतराचा फोटोही होता". 

सुष्मिता सेन पुढे म्हणाली की, "जेव्हा सलमान आणि माझी मैत्री झाली, तेव्हा त्यानं मला माझा आवडता चित्रपट कोणता आहे असं विचारलं होतं. तर मी 'मैंने प्यार किया' असल्याचं सांगितलं होत. त्यानंतर सलमान लगेच डेव्हिड धवनकडे गेला आणि म्हणाला की, मला सुष्मिता सेनसोबत 'मैने प्यार क्यो किया' हा चित्रपट करायचा आहे". २००५ साली आलेल्या 'मैंने प्यार क्यों किया' या चित्रपटात सलमानसोबत सुष्मिता आणि कतरीना कैफ झळकल्या होत्या.  

टॅग्स :सलमान खानसुश्मिता सेनसेलिब्रिटीबॉलिवूड