सिद्धार्थ मल्होत्रा बॉलिवूडच्या हँडसम अभिनेत्यांपैकी एक आहे. आज तो आपला 36वा वाढदिवस साजरा करतो आहे. सिद्धार्थ हा बॉलिवूडचा लोकप्रिय चेहरा बनला आहे. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती, परंतु अभिनेता होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली.
सिद्धार्थने वयाच्या 18 व्या वर्षी आपल्या पॉकेटमनी मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवलं. त्याने बर्याच फोटोशूट्स आणि फॅशन शोमध्ये भाग घेतला आणि आपल्या कामावर समाधानी नसल्यामुळे 4 वर्षांनंतर तो सोडण्याचा निर्णय घेतला. तो केवळ अभिनयाचे स्वप्न पाहत नव्हता तर करण जोहरच्या 'माय नेम इज खान' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून नशीब आजमावलं. इतकेच नव्हे तर सिद्धार्थने रजत टोकसबरोबर टीव्ही सीरियल 'पृथ्वीराज चौहान' मध्ये काम केले, पण त्यांना इथे ओळख मिळू शकली नाही.
'स्टुडंट ऑफ द ईयर' त्यानंतर 'हंसी तो फसी', 'एक विल्लन', 'ब्रदर्स', 'कपूर अँड सन्स', 'बार देखो' आला. 'ए जेंटलमॅन' 'इत्तेफाक' 'अय्यारी' 'जबरीया जोडी' आणि 'मरजावांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं.