Har Har Mahadev Controversy : ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटावरून सुरु झालेला वाद अद्यापही शमलेला नाहीये. गेल्या काही दिवसांपासून ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून वाद सुरू आहे. यापूर्वी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन या चित्रपटाला विरोध केला होता. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेन्द्र आव्हाड यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली होती. अशात हा चित्रपट आज 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवर प्रसारित झाला आहे. आज दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
‘हर हर महादेव’ टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल,असं ट्वीट संभाजीराजे यांनी केलं होतं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काही शिवभक्त सुबोध भावेच्या (Subodh Bhave) भेटीसाठी पोहोचले होते. कोल्हापुरातील शिवभक्तांनी सुबोध भावेची भेट घेत चित्रपटातून आक्षेपार्ह सीन वगळण्याची मागणी केली. यावेळी सुबोध भावेनं वेगळीच भूमिका मांडली. यापुढे आप कधीही कुठल्याही बायोपिकमध्ये ऐतिहासिक भूमिका साकारणार नसल्याचं त्याने जाहिर करून टाकलं.
‘हर हर महादेव’ या चित्रपटात सुबोधने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे. पण हा सिनेमा प्रदर्शित होताच वादात सापडला. या संपूर्ण वादानंतर सुबोधने यापुढे कुठलीही ऐतिहासिक भूमिका करणार नसल्याचं सांगितलं.‘मरेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणार. परंतु, पण इथून पुढे कोणत्याही ऐतिहासिक सिनेमात कोणाचीही भूमिका बापजन्मात करणार नाही. सध्या मी एक बायोपिक करतोय. त्याचं शूटींग सुरू आहे. शूटींग सुरू असलेला हा माझा शेवटचा बायोपिक सिनेमा असेल, असे सुबोध भावेनं स्पष्ट केलं.
‘हर हर महादेव’ या चित्रपटात आक्षेपार्ह सीन असल्याचा आरोप करत शिवभक्तांनी हा चित्रपट थिएटरमध्ये बंद पाडला होता. परंतु, त्यांतर आता 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार म्हटल्यावर विरोध तीव्र झाला होता. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले होता. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाºया गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, इसा इशारा संभाजीराजे यांनी दिला होता.