प्रसिद्ध रॅपर हार्ड कौर सध्या एका वादामुळे चर्चेत आली आहे. या वादानंतर तिचे ट्विटर अकाउंट संस्पेंड करण्यात आले आहे. हार्ड कौरने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी अपशब्दांचा वापर करण्यात आला होता. यात ती खलिस्तानी समर्थकांसोबत दिसली होती. हे सर्वजण खलिस्तान चळवळीवर बोलत होते.2 मिनिटे 20 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हार्ड कौरने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले होते. हार्ड कौरने तिच्या ट्विटरवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आणि काही क्षणात तो ट्रेंड होऊ लागला. यानंतर हार्ड कौरने तिच्या आगामी गाण्याची प्रमोशन क्लिप तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली. या क्लिपमध्येही ती पुन्हा त्याच खलिस्तानी समर्थकांसोबत दिसली. तिच्या या वादग्रस्त व्हिडीओ व क्लिपमुळे ट्विटरने तिचे अकाऊंट ‘सस्पेंड’ केले.
रॅपर हार्ड कौरचा मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ, ट्विटरने केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 10:57 AM
प्रसिद्ध रॅपर हार्ड कौर सध्या एका वादामुळे चर्चेत आली आहे. हार्ड कौरने एक व्हिडीओ शेअर केला होता.
ठळक मुद्दे एक ग्लासी, पैसा फेंक, पार्टी अभी बाकी है ही हार्ड कौरची गाणी तुफान गाजलीत. हार्ड कौरचे खरे नाव तरण कौर ढिल्लन आहे.