‘बाहुबली 2’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या उत्सुकतेत आणखी एक भर घालणारी गोष्ट म्हणजे, या चित्रपटात अभिनेता प्रभास ‘डबल रोल’मध्ये दिसणार आहे. एकीकडे तो शिवुडू (महेंद्र बाहुबली) ची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात त्याचे वजन ८६ से ८८ किलो आहे, तर दुसरीकडे तो बाहुबली (अमरेंद्र बाहुबली) ची भूमिका वठवणार आहे. यात त्याचे वजन १०५ किलो आहे. यासाठी अभिनेता प्रभासने मिस्टर वर्ल्ड असलेल्या लक्ष्मण रेड्डीकडून खास ट्रेनिंग घेतले. या भूमिकांसाठी प्रभासने दोन वेळा स्वत:चे वजन वाढवले आणि कमी केले. २०१० मध्ये ‘मिस्टर वर्ल्ड’चा किताब जिंकणाऱ्या लक्ष्मण रेड्डी यांनीच ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, बाहुबलीच्या भूमिकेसाठी प्रभासला वजन वाढवण्याची गरज होती, तर शिवुडूच्या भूमिकेसाठी त्याला वजन कमी करण्यासोबतच टोंड बॉडी हवी होती.दिवसभराच्या शूटिंगनंतर तो अर्ध्या तासाचा कार्डिओ करायचा. यादरम्यान तो कडक डाएटवर होता. शिवुडूच्या भूमिकेसाठी त्याचे सगळे कार्बोहायड्रेट बंद करून केवळ त्याला प्रोटिन दिले जात होते.अंडी, चिकन, बदाम, मासे आदींचा यात समावेश होता. बाहुबलीच्या भूमिकेसाठी नंतर त्याला मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट दिले गेलेत. प्रभासला बिर्यानी जिवापाड आवडते; पण २० दिवसांत एकदाच त्याला बिर्याणी मिळायची. अनेकदा प्रभासला जंक फूड खायची इच्छा व्हायची;पण त्याने शिस्त कधीच तोडली नाही.या सिनेमासाठी प्रभासने जिवापाड मेहनत घेतल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
'डबल रोल' साठी प्रभासने घेतली अशी मेहनत
By admin | Published: March 25, 2017 1:31 AM