झी मराठीवर नुकताच 'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gavat Show) हा नवीन शो दाखल झाला आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोमध्ये ऐशो आरामात जगलेल्या मुली स्पर्धक म्हणून दाखल झाल्या आहेत, ज्या गावात जाऊन तिथली संस्कृती आणि नवीन गोष्टी शिकणार आहेत. यादरम्यान त्या वेगवेगळ्या टास्कचा सामनादेखील करणार आहेत. या शोचं सूत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) करत आहे. नुकतेच त्याने मुलाखतीत या शोबद्दल आणि त्याने हा शो स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं. तो हा शो नाकारणार होता. मात्र त्याच्या वहिनीसाठी त्याने हा शो स्वीकारल्याचे मुलाखतीत हार्दीकने सांगितले.
हार्दिक जोशीच्या वहिनीचं काही दिवसांपूर्वी निधन झाले. याबद्दल त्यानेच पोस्ट शेअर करत सांगितले होते. आता त्याने मुलाखतीत वहिनीमुळे त्याने शो स्वीकारल्याचे सांगितले. तो म्हणाला की, माझ्यासाठी हा शो माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. माझी वाहिनी खूप आजारी होती आणि मी या शोमधून आपले पाऊल मागे घेत होतो. पण जेव्हा माझ्या वाहिनीला समजले की मी 'जाऊ बाई गावातला' नकार द्यायला जात होतो, तेव्हा हॉस्पिटलमध्ये तिने तिच्या हातात माझा हात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतले की हा शो तू सोडायचा नाही. कारण तिला माहिती आहे की मी कामातून कधी माघार घेत नाही, तर तिझ म्हणणे होते की जी गोष्ट आजपर्यंत नाही केली ती यापुढे ही करायची नाही.