Join us

अक्षया देवधरच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक जोशीची खास पोस्ट, म्हणाला - माझ्या आयुष्यातील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 17:32 IST

Akshaya Deodhar And Hardik Joshi :अक्षया देवधरच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक जोशीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala) या मालिकेनं निरोप घेतला असला तरी ही मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardik Joshi) या जोडीने अंजलीबाई आणि राणादा या मुख्य भूमिका साकारल्या होत्या. विशेष म्हणजे या मालिकेच्या सेटवर ही जोडी प्रेमात पडली आणि त्यांनी लग्नगाठ सुद्धा बांधली. लग्नानंतरही हे कपल सतत चर्चेत येत असतात. दरम्यान आज पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरच्या वाढदिवसानिमित्त राणादा म्हणजेच हार्दिक जोशीने खास पोस्ट शेअर केली आहे.

अक्षया देवधर ३० वर्षांची झाली असून तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यात आले आहे. हार्दिकने शेअर केलेल्या फोटोत अक्षया ३० नंबर लिहिलेला केक कट करते आहे. दुसऱ्या फोटोत ते दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हार्दिक जोशीने इंस्टाग्रामवर अक्षया देवधरसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, माझ्या अद्भुत पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आहेस. तुझ्याशिवाय मी एक दिवस घालवण्याची मी कल्पना करू शकत नाही. मला आशा आहे की पुढील वर्ष तुमच्यासाठी अनेक आश्चर्यकारक नवीन रोमांच घेऊन येईल. या पोस्टवर चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल हार्दीकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, काही दिवसांपुर्वी तो 'नवरदेव B.sc Agri' या सिनेमात दिसला. याशिवाय हार्दीक सध्या स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत अभिनय करतोय. अक्षया कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसत नाही.

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीतुझ्यात जीव रंगला