हरमन बावेजा आठवतो? होय, 2009 मध्ये आलेल्या ‘लव्ह स्टोरी 2050’ या चित्रपटाचा हिरो. ‘लव्ह स्टोरी 2050’ मधून बॉलिवूड डेब्यू करणारा हरमन त्याच्या अॅक्टिंगपेक्षा हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रीय झाला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण लुक्स आणि हॉट बॉडी यामुळे हरमनची त्यावेळी बरीच क्रेझ होती. अर्थात हळूहळू ही क्रेझ ओसरली आणि हरमन बॉलिवूडमधून बाहेर फेकल्या गेला. आता हाच हरमन पुन्हा चर्चेत आला आहे. कारण काय तर, हरमनने साखरपुडा केला आहे.
हेल्थ कोच साशा रामचंदानीसोबत हरमनचा साखरपुडा पार पडला. हरमनची बहीण रोवेनाने सोशल मीडियावर दोघांच्या रोका सेरेमनीचा फोटो शेअर करत, दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘साशा, आमच्या कुटुंबात तुझे स्वागत आहे. दोघांनाही खूप सारे पे्रम’, असे तिने लिहिले आहे. सागरिका घाटके आणि शमिता शेट्टी यांनीही दोघांचा फोटो शेअर करत, दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हरमनची होणारी वधू साशा ही न्यूट्रिशन हेल्थ कोच आहे. अभिनेत्री सागरिका घाटगेची ती मैत्रिण आहे. साशा इन्स्टाग्रामवर ‘बेटर बॅलेन्स सेल्फ’ नावाचे पेज चालवते.हरमन व प्रियंका चोप्रा यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या एकेकाळी प्रचंड गाजल्या होत्या. दोघेही पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. ‘लव्ह स्टोरी 2050’च्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम फुलले होते. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले. यानंतर हरमन व बिपाशा यांच्या डेटींगच्या बातम्याही आल्यात.
2014 मध्ये आपण बिपाशासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे हरमनने म्हटले होते. मात्र त्यावर्षी डिसेंबरमध्ये बिपाशाने हरमनसोबत ब्रेकअप झाल्याचे जाहिर केले. विक्ट्री, व्हाट्स योर राशी, ढिश्कियाऊ असे चित्रपट हरमनच्या नावावर आहेत. पण हे सगळेच चित्रपट आपटलेत अन् हरमनच्या करिअरला उतरती कळा लागली.
या कारणामुळे झाले होते हरमन बावेजा आणि प्रियंका चोप्राचे ब्रेकअप, दोन वर्षे होते रिलेशनशीपमध्ये