इंडियन गर्ल हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) यंदाचा मिस युनिव्हर्सचा (Miss Universe 2021) खिताब जिंकला असून तब्बल 21 वर्षांनी भारताला हा सन्मान मिळाला आहे. 21 वर्षीय हरनाज मूळ पंजाबची रहिवाशी असून यापूर्वी लारा दत्ताने देशाला हा बहुमान मिळवून दिला होता. इस्रायलच्या इलियट येथील एका रिसॉर्टमध्ये आयोजित या स्पर्धेत मॅक्सिकोची माजी मिस यूनिव्हर्स एंड्रिया मेजाने हरनाज संधुच्या डोक्यावर ताज चढवला. हरनाज संधूचा जन्म चंदीगडच्या एका शीख कुटुंबात झाला. हरनाजला लहानपणापासून सौंदर्य आणि फिटनेसची आवड आहे.
अमर उजालाच्या रिपोर्ट्सनुसार, एक काळ असा होता की हरनाजची तिचं वजन कमी असल्यामुळे खिल्ली उडवली जायची. कमी वजनामुळे तिला खूप तणाव जाणवत होता. यावर तिने सकारात्मक मानसिकता ठेवून मात केली. ती म्हणाले की, यातून बाहेर पडण्यासाठी आपण अशा व्यक्तीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे ज्याच्याशी आपण मोकळेपणाने बोलू शकतो. यातून बाहेर पडण्यासाठी माझ्या कुटुंबाने पूर्ण पाठिंबा दिला.
21 वर्षीय हरनाज मूळ पंजबाची रहिवाशी आहे.हरनाज उच्च शिक्षित असून तिने पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.२०१७ मध्ये तिने मिस चंदीगडचा खिताब जिंकला होता.२०१८ मध्ये तिला 'मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८'चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला.मिस इंडिया स्पर्धेत भाग घेणाऱ्या हरनाजने या स्पर्धेत प्रथम टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवण्यास यशस्वी ठरली.या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला.