नुकताच प्रदर्शित झालेला ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट रसिकांच्या मनात घर करीत आहे. चित्रपटाची कथा, भूमिका, दर्जा, लेखन सर्वच बाबींमुळे सामाजिक, राजकीय संदेश मांडते. त्याचबरोबर यातील मूकबधिर मुलगी शाहिदा म्हणजेच हर्षाली मल्होत्रा सर्वांचे मन जिंकून घेत आहे; पण तिच्याबद्दल गुपित समोर आले आहे. ती खऱ्या आयुष्यात अत्यंत बोलकी आहे. कधीच शांत बसत नाही. वर्कशॉप्स सुरू असताना ती कशी शांत बसेल? याची चिंता मुकेश छाबडा (कास्टिंग डायरेक्टर) यांना असते. सलमान आणि कबीर हे दोघेही असा प्रयत्न करतात की, ती इतर को-अॅक्टर्ससोबतही खेळेल आणि बोलेलही. तिची आई म्हणते की, ‘हर्षाली, तिची अॅक्टिंग आणि अभ्यास समप्रमाणात करते. तिला कोणत्या चित्रपटाच्या आॅफर्स मिळतात त्यावर आम्ही तिच्या भविष्याबद्दल विचार करू. मात्र, टेलीव्हिजनच्या आॅफर्स आम्ही स्वीकारणार नाही.’ तसेच हर्षाली म्हणते की, ‘मला सलमान अंकलप्रमाणे सुपरस्टार व्हायचे आहे. सलमान अंकल माझ्यासोबत सेटवर बार्बी गेम्स आणि टेबल टेनिस खेळतात. मी कबीर अंकलच्या मांडीवर बसून बार्बी गेम्स खेळते. करिना आंटी शूटिंगमध्ये बिझी असल्याने तिच्यासोबत गेम्स खेळू शकले नाही. सलमान अंकल तर टेबल टेनिसदेखील खेळायचे.’
सलमान अंकलसोबत हर्षालीचा टेबल टेनिस
By admin | Published: July 23, 2015 3:23 AM