स्टार प्लस वाहिनीवरील 'द व्हॉइस' या कार्यक्रमात एक प्रशिक्षक म्हणून करीत असलेल्या कामाबद्दल हर्षदीप कौरचे सगळीकडून खूप कौतुक होत आहे. अदनान सामी, कनिका कपूर आणि अरमान मलिक या अन्य प्रशिक्षकांबरोबर ती या स्पर्धकांच्या गायन कलेला पैलू पाडत असल्याबद्दल प्रेक्षकांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे. हर्षदीपच्या मते हे स्पर्धक आता तिच्या कुटुंबाचाच एक भाग बनले असल्याने तिने त्यांना आपल्या घरी फराळासाठी आमंत्रित केले होते.
एका सूत्राने सांगितले, हर्षदीप या स्पर्धकांमध्ये मनाने गुंतली असून ती त्यांना आपल्या कुटुंबाचेच सदस्य मानते. या स्पर्धकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि त्यांना एक वैयक्तिक स्पर्श लाभावा यासाठी तिने त्यांना आपल्या घरी अनौपचारिक भेटीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी तिने सर्वांना खमंग भजी आणि चहा दिला. त्यानंतर त्या सर्वांनी हर्षदीपबरोबर एकत्र गाणीही गायली.
'द व्हॉइस' शो शनिवार-रविवारी रात्री ८ वाजता फक्त स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे.