हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री किम शर्मा या दोघांचे प्रेम सध्या बहरात आहे. गेल्या काही दिवसांत हर्षवर्धन आणि किम दोघेही बिनधास्त फिरताना दिसत आहेत. काल-परवा हे कपल बाईक राईडिंग करताना दिसले. यादरम्यान दोघांनीही जाम मस्ती केली. त्यांच्या या मस्तीचे फोटोही व्हायरल झालेत. पण आता हे कपल मुंबई पोलिसांच्या रडारवर आले आहे. होय, जाणीवपूर्वक वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरूद्धही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांवरही पोलिसांनी तीन आरोप ठेवले आहेत. एक म्हणजे विना हेल्मेट गाडी चालवणे, दुसरा म्हणजे नशेत बाईक चालवणे आणि तिसरा म्हणजे सुमारे दीड किमी राँग साईड गाडी चालवणे.मुंबई वाहतूक पोलिसांनी हर्षवर्धन आणि किमने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोघांनाही दोषी ठरवले आहे. यानंतर दोघांनाही अॅटोमटिक ई-चालान जारी करण्यात येईल. या पश्चात लवकरच या कपलला समन्स जारी केला जाईल.
काही दिवसांपूर्वी एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून हे दोघेही भेटले आणि मग गाठीभेटी वाढल्यावर त्यांच्याबद्दल भलतीच चर्चा रंगली. गत एप्रिलमध्ये नंदिता महतानीच्या फॅशन शोमध्ये हे कथित कपल पहिल्यांदा एकत्र दिसले आणि आता हे जोडपे मुंबईत बिनधास्त फिरताना दिसते. काही दिवसांपूर्वी किमला भेटण्यासाठी हर्षवर्धन अंधेरी ते वांद्रे असा बाईक प्रवास करत आला होता. जेणेकरून तो ट्रॅफिकमध्ये अडकू नये. आता या दोघांना जुहूत एकत्र पाहिले गेले़ तेही एकमेकांच्या हातात हात घालूऩ मीडिया समोर पाहून दोघेही काहीक्षण गोंधळलेत. हर्षवर्धन तर आपल्या फोनमध्ये बिझी होता. पण किमला मीडियापुढे कसे रिअॅक्ट व्हावे, तेच कळले नाही. किमचे नाव अनेक व्यक्तींशी जोडण्यात आले आहे. क्रिकेटर युवराज सिंग नंतर किम शर्मा स्पॅनिश बॉयफ्रेन्ड कार्लोस मार्टिनला डेट करत होती. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर काय झाले हे कुणालाच कळले नाही. अचानक किमने अली पुंजानीसोबत लग्न केले. केवळ एक आठवड्याच्या डेटींगनंतर किम आणि अली यांनी २०१० मध्ये लग्न केले होते. यानंतर किमने मुंबईसोडून केन्याला तिच्या पतीसोबत राहायला गेली होती़ पण पुढे त्यांचा घटस्फोट झाला़