Join us

Sapna Choudhary: तैमूर, जहांगीरनंतर सपना चौधरीच्या मुलाचं नाव चर्चेत, सार्वजनिक होताच सैफ-करीना ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 12:10 PM

करीना आणि सैफ यांनी त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. तर सपना चौधरीच्या मुलाचे नाव समजल्यानंतर सर्व जण तिची तारीफ करत आहेत.

बिग बॉस फेम तथा हरियाणाची डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) हिच्या मुलाचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. पण या वाढदिवसापेक्षाही सपना चौधरीच्या मुलाच्या नावाचीच चर्चा अधिक होत आहे. आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवशी सपना चौधरीने त्याचे नाव सार्वजनिक केले. हे नाव सार्वजनिक होताच, त्याचा संबंध करीना कपूर (kareena kapoor) आणि सैफ अली खानशी (saif ali khan) जोडला जात आहे. खरे तर, करीना आणि सैफ यांनी त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. तर सपना चौधरीच्या मुलाचे नाव समजल्यानंतर सर्व जण तिची तारीफ करत आहेत. तर सैफ अली खान आणि करीना कपूर यांना ट्रोल करत आहेत.

सपना चौधरी सध्या तिच्या गाण्यांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी ती घरातील तयारीत व्यस्त होती. तसेच तिचा पती वीर साहूही मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अत्यंत उत्साहात होता.

सपनाच्या मुलाचा फोटो पाहण्यासाठीही चाहत्यांना पाहावी लागली वाट -सपना चौधरीच्या मुलाचा पहिला फोटो पाहण्यासाठी चाहत्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. त्याचा फोटो सपना चौधरीच्या कुटुंबीयांनी शेअर केला होता आणि तो लगेचच व्हायरल झाला. मात्र, सपनाच्या मुलाच्या नावाची उत्सुकता अद्यापही कायमच होती. सपनाच्या मुलाचे नाव "पोरस" आहे, हे लोकांना माहित नव्हते. या वाढदिवसालाच हे नाव सार्वजनिक करण्यात आले. परसाने तैमूर आणि जहांगीरचा पराभव केला होता. तैमूर हा अत्यंत क्रूर शासक होता. त्याने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. अशात, सपना चौधरीच्या मुलाच्या नावासंदर्भात सर्वच स्थरांतून चांगल्या प्रतिक्रिया ये आहेत.

पाच वर्ष सुरू होते प्रेम प्रकरण - सपना चौधरी आणि वीर साहू यांचा विवाह जानेवारी 2020 मध्ये काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच झाला. ऑक्टोबर 2020 मध्ये सपना चौधरी आई झाली. सपना आणि वीर यांची प्रेमकथा 2015 मध्ये सुरू झाली. पहिल्या भेटीत वीर सपनाला थोडा खडूस वाटला होता. पणनंतर ती त्याच्या प्रेमात पडली. वीरही पहिल्याच नजरेत स्वप्नाच्या प्रेमात पडला होता. लग्नाच्या काही दिवस आधीच, वीर आणि सपना यांनी त्यांच्या प्रेमासंदर्भात पुष्टी केली होती. पण त्यांनी लग्नाबद्दल काहीही सांगितले नव्हते. यानंतर, अचानकच सपना चौधरी आई झाल्याचे वृत्त आले, तेव्हा लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली होती. मग, ट्रोल झाल्यानंतर, पती वीर साहूने स्वतःच लाइव्ह येत ट्रेलर्सचा क्लास घेतला होता. 

टॅग्स :सपना चौधरीकरिना कपूरसैफ अली खान बॉलिवूडतैमुर