गतवर्षी ‘लवयात्री’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता आयुष शर्मा याचे नशीब सध्या जोरावर आहे, असेच म्हणायला हवे. होय, आयुषचा डेब्यू अगदी वाजत-गाजत झाला. आयुषचे लॉन्चिंग ग्रॅण्ड व्हावे, यासाठी अख्खे खान कुटुंब झटले.खुद्द सलमान खानने आयुषच्या लॉन्चिंगचा जिम्मा आपल्या खांद्यावर घेतला. पण दुदैवाने आयुषचा डेब्यू फसला. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. पण तरिही आयुषला कामाची कमतरता नाही. ताजी बातमी खरी मानाल तर आयुषला तिसरा चित्रपटही मिळाला आहे. लवकरच तो दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या एका चित्रपटात दिसणार आहे.
‘आयुष शर्मा की तो निकल पडी’... ! मिळाला तिसरा चित्रपट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 11:25 IST
गतवर्षी ‘लवयात्री’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता आयुष शर्मा याचे नशीब सध्या जोरावर आहे, असेच म्हणायला हवे.
‘आयुष शर्मा की तो निकल पडी’... ! मिळाला तिसरा चित्रपट!!
ठळक मुद्देआयुष शर्मा तूर्तास आपल्या दुस-या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. पण यासाठी आयुषला १६ किलो वजन वाढवायचे आहे. आत्तापर्यंत त्याने १० किलो वजन वाढवले आहे.