Join us

तुम्ही कधी मृण्मयी देशपांडेच्या नवऱ्याला पाहिलंत का?, दिसायला एखाद्या अभिनेत्या इतकाच आहे हँडसम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 6:33 PM

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं.

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते. आज आपण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत. कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.

मृण्मयी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मृण्मयी अनेक वेळा त्याच्या कुटुंबासोबतचे फोटोदेखील शेअर करताना दिसते. मृण्मयी पतीसोबतचे रोमाँटिक फोटो ही शेअर करत असते. फोटोंमधून दोघांमधले बॉन्डिंग नेहमी दिसते.

मृण्मयीच्या पतीचं नाव स्वप्निल राव आहे. स्वप्निल दिसायला हँडसम आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा पती स्वप्नील राव ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील अनुरूप जोडी समजली जाते.३ डिसेंबर २०१६ रोजी व्यावसायिक स्वप्निल रावसह मृण्मयी रेशीमगाठीत अडकली होती.

स्वप्नील मृण्मयीला बघायला गेला होता त्यावेळी मृण्मयीला पाहताक्षणीच त्याला तिच्यावर प्रेम झाले होते.मृण्मयी स्वप्निल या दोघांचेही स्वभावही खूप मिळते जुळते आहेत.स्वप्नील रावचा चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नाही. तो एक बिझनेसमन आहे. मृण्मयी आणि स्वप्नीलचा सुखी संसार सुरू आहे.

टॅग्स :मृण्मयी देशपांडे