Join us

साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनचं आलिशान घर पाहिलंत का?, पाहा काही खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 6:50 PM

अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या चित्रपटासोबतच लक्झरी लाइफमुळे चर्चेत येत असतो.

साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत येतो आहे. त्याला कारणही तसे खासच आहे. ते म्हणजे नुकताच त्याचा पुष्पा चित्रपट (Pushpa Movie) रिलीज झाला. या चित्रपटात त्याने साकारलेल्या पुष्पराजला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनचे आजोबा कॉमेडीयन तर वडील निर्माते म्हणून टॉलिवूड इंडस्ट्रीत प्रचलित आहे.

२००३ साली गंगोत्री या साउथ चित्रपटाच्या माध्यमातून अल्लू अर्जुनने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्याचे बरेचसे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा खूप मोठा फॅन फॉलोअर्स आहेत. अल्लू अर्जुन त्याच्या चित्रपटासोबतच लक्झरी लाइफमुळे चर्चेत येत असतो.

तो त्याच्या कुटुंबासोबत हैदराबाद मधील ज्युबिली हिल्स या आलिशान एरियात राहतो. बाहेरून त्याचे घर अगदी साधेसुधे दिसत असले तरी सर्वसोयीसुविधांनी परिपूर्ण आहे. इंटेरिअर डिझायनर आमिर आणि हमीदा यांनी त्याचे घर सजवले आहे. विशेष म्हणजे सर्व रुमने व्हाइट रंगाने पेंट केले आहे. प्रशस्त हॉल, किचन, गार्डन एरिआ आणि स्विमिंगपुल अशा वस्तूंनी त्याचे घर सजलेले आहे. 

अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी ही के सी शेखर रेड्डी या प्रसिद्ध व्यवसायिकेची मुलगी आहे. अमेरिकेतून शिक्षण घेऊन ती मायदेशी परतली आहे. ६ मार्च २०११ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. आयान आणि अरहा ही दोन मुले त्यांना आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुन