रजनीकांत (Rajinikanth ) हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ते नेहमी चर्चेत येत असतात. नुकताच त्यांनी कुटुंबांसोबत पोंगल सण साजरा केला. यावेळी त्यांच्या घरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेते रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या या सोशल मीडियावर सक्रिय राहून नेहमीच चाहत्यांना अपडेट देत असतो. आता नुकतेच त्यांनी कुटुंबीयांबरोबर पोंगल साजरा केला आणि सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोन्ही मुलांसोबत त्यांनी आई-वडिलांच्या घरी हा सण साजरा केला. पहिल्या फोटोत ऐश्वर्या स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत केळीच्या पानावर पदार्थ वाढताना दिसत आहेत, तिसऱ्या फोटो त्या गाईला नैवेद्य दाखवताना दिसत आहेत.
तर चौथा फोटो त्या त्यांचे आई-वडील म्हणजेच रजनीकांत आणि लता यांचे आशीर्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी पोस्ट केलेल्या या शेवटच्या फोटोमध्ये रजनीकांत यांच्या घरातला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसत आहे. रजनीकांत यांची मातृभाषा मराठी आहे. दक्षिणात्य चित्रपटातून काम करत जगभर प्रसिद्धी मिळालेले अभिनेते रजनीकांत हे आज आजही त्यांचे मूळ विसरलेले नाहीत. त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर आणि प्रेम आहे. आता त्यांच्या घरातला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. त्यांचे चाहते या फोटोवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.