आपल्या आवडत्या कलाकारांच्या पर्सनल लाईफबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. कलाकारही आपल्या पर्सनल लाईफची माहिती फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावरुन चाहत्यांना देत असतात. मराठी अभिनेता सुबोध भावे(subodh bhave )चाही सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. जो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. सुबोधही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना वेळोवेळी आगामी प्रोजेक्टबाबत माहिती देत असतो.
सुबोध सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सध्या तो संपूर्ण कुटुंबासोबत राजस्थानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतो आहे. सोशल मीडियावर त्याने राजस्थानमधील फोटो शेअर केले आहेत. यात सुबोध त्याची पत्नी मंजिरी आणि दोन मुलं दिसतायेत. सुबोधच्य मुलांची कान्हा आणि मल्हार अशी आहेत..सुबोध या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतायेत. अलिकडेच सुबोधची पत्नी मंजिरी भावे यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. झी मराठीवर 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?' मालिकेची निर्मिती मंजिरी भावे यांनी केली आहे.
अलिकडेच सुबोधनं हर हर महादेव’ या चित्रपटात सुबोधने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे. पण हा सिनेमा प्रदर्शित होताच वादात सापडला. या संपूर्ण वादानंतर सुबोधने यापुढे कुठलीही ऐतिहासिक भूमिका करणार नसल्याचं सांगितलं.‘मरेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणार. परंतु, पण इथून पुढे कोणत्याही ऐतिहासिक सिनेमात कोणाचीही भूमिका बापजन्मात करणार नाही. सध्या मी एक बायोपिक करतोय. त्याचं शूटींग सुरू आहे. शूटींग सुरू असलेला हा माझा शेवटचा बायोपिक सिनेमा असेल, असे सुबोध भावेनं स्पष्ट केलं.