सिनेइंडस्ट्रीत बऱ्याचदा कास्टिंग काउचबद्दल ऐकायला मिळतं. याबद्दलचा धक्कादायक खुलासा बऱ्याचदा अभिनेत्री करताना दिसतात. मात्र एका बॉलिवूड अभिनेत्यालाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. याबाबतचा खुलासा खुद्द त्यानेच केलाय. त्याने सांगितले होते की, कामाच्या बदल्यात कास्टिंग डिरेक्टरने त्याला प्रायव्हेट पार्ट दाखवण्याची मागणी केली होती.
हा अभिनेता म्हणजे आयुषमान खुराना(Ayushman Khurana). आयुषमान खुरानाने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सुरूवातीच्या काळात त्याला आलेल्या कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल सांगितले. त्याने सांगितले होते की, कसा तो कास्टिंग काउचला बळी पडणार होता, मात्र तो थोडक्यात बचावला. आयुषमानने सांगितले की, एका कास्टिंग डिरेक्टरने मला सांगितले होते की, जर मी त्याला माझा प्रायव्हेट पार्ट दाखवला तर तो मला सिनेमात मुख्य भूमिका देईल. मात्र मी त्याला म्हटलं की, मी स्ट्रेट आहे आणि मी ती ऑफर नाकारली.
अभिनेत्याला कामासाठी करावा लागला खूप स्ट्रगलआयुषमान पुढे म्हणाला की, पहिल्यांदा जेव्हा मी ऑडिशनसाठी जायचो तेव्हा तिथे सोलो टेस्ट घेतली जात होती. अचानक लोक वाढत होते आणि एकाच खोलीत ५० लोक एकत्र यायचे आणि याचा विरोध केला की मला काढून टाकले जायचे. त्यामुळे मला अनेकदा नकार झेलावा लागला आहे. बऱ्याचदा अभिनेत्याला तुझे आयब्रो खूप बुशी आहे असे म्हणत रिजेक्ट केले जायचे. मात्र राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याने कधीच हार मानली नाही आणि स्वतःच्या हिमतीवर आपलं स्थान निर्माण केलं. आयुषमान खुरानाने पुढे म्हटले की, अपयशदेखील सहजरित्या सांभाळू शकतो. जर त्याने त्याच्या करिअरमध्ये अपयश पाहिले नसते तर कदाचित तो इथपर्यंत पोहचू शकला नसता असे तो सांगतो.
वर्कफ्रंट आयुषमान खुरानाने विक्की डोनर, दम लगा के हईशा, बरेली की बर्फी, शुभ मंगल सावधान, ड्रीम गर्ल, ड्रीम गर्ल २ सारख्या सिनेमात काम केले आहे. या सिनेमातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. याशिवाय तो गुगली आणि छोटी सी बातमध्ये दिसणार आहे.