Join us

Bigg Boss Marathi 2 : हिनाच्या सेक्सी आणि बोल्ड अदा पाहून तुम्ही व्हाल क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 11:38 IST

हिना पांचाळ  हे नाव 'बिग बॉस सीझन 2'मुळे चर्चेत आली. बिग बॉसच्या घरात हिनाला वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाली.

हिना पांचाळ  हे नाव 'बिग बॉस सीझन 2'मुळे चर्चेत आली. बिग बॉसच्या घरात हिनाला वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाली. हिना बिग बॉसच्या घरात टास्क पूर्ण करते. तसेच तिचा घरात सगळ्या गोष्टीत सहभाग असतो. बऱ्याचदा तिची वीणा, शिवानी व रुपाली यांच्यासोबत वादावादी होताना पहायला मिळते. 

हिनाने बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मलायका अरोरासारखे हिनाचे लुक्स आहेत. त्यामुळे तिला मलायकाची कॉपी देखील म्हटलं जाते. हिना सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळतेय.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. फोटोमधील हॉट आणि तिचा बोल्ड अंदाज फॅन्सच्या पसंतीस देखील पडतो. 

मुळाची गुजराती असलेल्या हिनाचं बालपण ठाण्यात गेलं आहे. त्यामुळे तिला मराठी समजतं आणि बोलता येतं. हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे विशेष म्हणजे २०१५ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटाच्या यादीत हिनाचा  समावेश होता

टॅग्स :हिना पांचाळबिग बॉस मराठी