Join us  

सहायक दिग्दर्शक झाले पडद्यावरील नायक

By admin | Published: March 25, 2016 1:19 AM

एप्रिलमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘की अ‍ॅण्ड का’ चित्रपटाच्या प्रदर्शनात व्यस्त अर्जुन कपूर नायक म्हणून मिळालेल्या यशात एका गोष्टीचे मोठे योगदान मानतो, ते म्हणजे दिग्दर्शन.

एप्रिलमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘की अ‍ॅण्ड का’ चित्रपटाच्या प्रदर्शनात व्यस्त अर्जुन कपूर नायक म्हणून मिळालेल्या यशात एका गोष्टीचे मोठे योगदान मानतो, ते म्हणजे दिग्दर्शन. कॅमेऱ्यासमोर नायक म्हणून येण्याअगोदर त्याने कॅमेऱ्याच्या मागे सहायक दिग्दर्शक म्हणूून काम केले आहे. अर्जुनने सहायक दिग्दर्शक म्हणून अनेक चित्रपटांत काम केले, ज्यात ‘शक्ती द पॉवर’ (करिश्मा कपूर, नाना पाटेकर), निखिल आडवाणीचा ‘कल हो न हो’ आणि ‘सलाम-ए-इश्क’ या चित्रपटांचा समावेश आहे. अर्जुनच्या बाबतीत मानले जाते की, ‘सलाम-ए-इश्क’च्या शूटिंगच्या दरम्यान त्याची सलमानशी मैत्री झाली आणि सलमाननेच त्याला नायक बनण्याच्या टीप्स दिल्या. सलमान स्वत: आपले करिअर सुरू करण्याअगोदर सहायक दिग्दर्शक होता. चित्रपट ‘फलक’ (ज्याचे लेखक त्याचे वडील सलीम खान होते)मध्ये तो शशिलाल नायरचा सहायक होता. ‘कहो न प्यार है’मध्ये हृतिक रोशनला नायक म्हणून लाँच करण्याअगोदर त्याचे वडील राकेश रोशन यांनी ‘किंग अंकल’, ‘कारोबार’, ‘करण-अर्जुन’ आणि ‘कोयला’ या चित्रपटांत हृतिकला आपल्या सहायकांच्या टीममध्ये ठेवले आणि या प्रकारे हृतिक चित्रपट मेकिंग शिकला. हृतिकप्रमाणेच रणबीर कपूरदेखील ‘आ अब लौट चलें’ (ऐश्वर्या रॉय आणि अक्षय खन्ना)च्या दरम्यान आपले वडील ऋषी कपूरचा सहायक होता. यानंतर रणबीर चित्रपट ‘ब्लॅक’मध्ये संजय लीला भन्सालीचा सहायक होता. रणबीरचे वडील ऋषी कपूर स्वत: नायक बनण्याअगोदर वडील राजकपूरचे सहायक होते. सनी देओलचा ‘यमला पगला दीवाना’ आणि त्याच्या सिक्वलसोबत आताच हिट ठरलेल्या ‘घायल रिटर्न’च्या टीममध्ये सनीचा मोठा मुलगा करण देओल सहायक म्हणून वडिलांसोबत काम शिकत होता. आता करणला हीरो म्हणून लॉँच करण्याची तयारी सुरू आहे.

- anuj.alankar@lokmat.com