‘कोण होईल मराठी करोडपती?’ कार्यक्रमाच्या एका खास भागात नुकत्याच मराठीतील नामवंत अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. या अभिनेत्री आपल्या लाडक्या मित्राच्या म्हणजेच स्वप्निल जोशीच्या स्वागतासाठी या कार्यक्रमात आल्या होत्या. या कार्यक्रमात काही अभिनेत्रींनी हॉट सीटवर बसून ‘कोण हाईल मराठी करोडपती’ हा खेळदेखील खेळला. या कार्यक्रमात या अभिनेत्रींनी ३ लाख २० हजारांची रक्कम जिंकली. ही रक्कम वाहिनी आणि प्रॉडक्शन हाऊस यांनी उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना दिली. शहीद जवान चंद्रकांत शंकर गलांडे आणि शहीद जवान विकास जनार्दन कुळमेठे यांच्या परिवाराला देण्यात आली. गलांडे यांना २ मुले असून, एक साडेतीन वर्षांचा, तर दुसरा केवळ ११ महिन्यांचा आहे. तर, कुळमेठे यांना १० महिन्यांची मुलगी आहे. आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांना ‘कोण होईल मराठी करोडपती’द्वारे एक छोटीशी मदत करण्यात आली असल्याचे या कार्यक्रमाच्या टीमने सांगितले.
शहिदांना दिला मदतीचा हात
By admin | Published: October 09, 2016 3:35 AM