Join us

Esha Deol Divorce : जावयाला मुलगाच मानायच्या हेमा मालिनी; आता लेकीच्या घटस्फोटानंतर व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:56 IST

Video : ईशा देओलच्या लग्नानंतर ढसाढसा रडल्या होत्या हेमा मालिनी; नेमकं काय घडलं होतं?

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलचा घटस्फोट झाला आहे. १२ वर्षांच्या सुखी संसारानंतर ईशाने पती भरत तख्तानीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ईशा आणि भरतने परस्पर संमतीने वेगळं झाल्याचं सांगत घटस्फोट घेतल्याचा खुलासा केला. गेल्या काही दिवसांपासून ईशा आणि भरत यांच्यात बिनसल्याच्या चर्चा होत्या. ईशाच्या घटस्फोटानंतर आता हेमा मालिनींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सोनी टीव्हीच्या इंडियन आयडॉल या रिएलिटी शोमधील हा व्हिडिओ आहे. या शोमध्ये हेमा मालिनी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ईशा देओलने हेमा मालिनींसाठी खास मेसेज पाठवला होता. "आईचा जो प्रवास मी पाहिला आहे. इतर कोणी क्वचितच पाहिला असेल. तुम्हा सगळ्यांची ती ड्रीम गर्ल आहे. पण, आमच्यासाठी ड्रीम गर्लबरोबरच आमची अम्माही आहे. तिने आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा पाठवणीच्या वेळी मी भावुक झाले होते. तो क्षण माझ्यासाठी खूप कठीण होता. पाठवणी वेळी आई खूप स्ट्राँग होती. पण, मी घरी गेल्यानंतर तिचा मला फोन आला आणि ती जोरजोरात रडत होती. आज मी जी काही आहे ती फक्त तुझ्यामुळे आहे. लव्ह यू", असं ईशा म्हणाली होती. 

त्यानंतर हेमा मालिनी भावुक झाल्या होत्या. त्यांना अश्रू अनावर झाल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. त्या म्हणाल्या होत्या की "ईशा आणि अहाना माझ्या गोड मुली आहेत. लग्नानंतर ती माझ्यासाठी जावई नाही मुलगा घेऊन आली, असं वाटतं होतं. माझ्या आयुष्यात माझी दोन मुलंच आली आहेत. माझ्या लेकींसाठी ते दोघेही खूप चांगले आहेत. मी खूप भाग्यवान आहे." आता ईशाच्या घटस्फोटोनंतर हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. 

२०१२ मध्ये ईशाने व्यावसायिक भरत तख्तानीशी विवाह केला होता. १२ वर्ष सुखाने संसार केल्यानंतर आता ते कायदेशीररित्या घटस्फोट घेत वेगळे झाले आहेत. त्यांना दोन मुली आहेत. 

टॅग्स :इशा देओलहेमा मालिनीसेलिब्रिटी