Join us

"राम मंदिरामुळे अनेकांना रोजगार मिळाला", रामललाचं दर्शन घेतल्यानंतर हेमा मालिनींचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 10:56 AM

हेमा मालिनी नुकत्याच अयोध्येला गेल्या होत्या. तिथे त्यांनी राम मंदिरात जाऊन रामललाचं दर्शन घेतलं.

काही दिवसांपूर्वीच अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य सोहळा झाला. केवळ देशातच नाही तर जगभरात या सोहळ्याची चर्चा होती. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनींनी या सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्येत नृत्याविष्कारही सादर केला होता. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनंतर आता हेमा मालिनींनी राम मंदिराला भेट दिली. 

हेमा मालिनी नुकत्याच अयोध्येला गेल्या होत्या. तिथे त्यांनी राम मंदिरात जाऊन रामललाचं दर्शन घेतलं. राम मंदिराला भेट दिल्यानंतर हेमा मालिनींनी मीडियाशी संवाद साधला. एएनआयशी दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "आम्हाला चांगलं दर्शन मिळालं. इथे व्यवस्थाही खूप चांगली केली आहे. या मंदिरामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे." रामललाचं दर्शन घेतल्यानंतर हेमा मालिनींनी पोस्टही शेअर केली आहे. 

२२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला होता. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल, कतरिना कैफ, रोहित शेट्टी, कंगना रणौत हे सेलिब्रिटीही उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठापनेनंतर राम मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. 

टॅग्स :हेमा मालिनीराम मंदिरअयोध्या