Hemangi Kavi : बॉलिवुडमध्ये किंग खानची (Shahrukh Khan) जादू अजून कायं आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. पठाण ला मिळणारा उत्तम प्रतिसाद बघून सर्वच अवाक झालेत. बॉयकॉट ट्रेंडचा कोणताच परिणाम सिनेमावर झालेला नाही. उलट दोनच दिवसात पठाणने २०० कोटींची कमाई केली आहे. शाहरुख ४ वर्षांनी रुपेरी पडद्यावर आला आहे मात्र तरी त्याचा जलवा कायम आहे.
तर खऱ्या आयुष्यातही शाहरुखच्या चांगुलपणाचं अनेक जण कौतुक करतात. मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील शाहरुखसाठी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्याच्या धर्मावर,त्याच्या दिसण्यावर बोलणाऱ्यांनी आता शांत बसा असं तिने पोस्टमधून म्हणलं आहे. फेसबुक पोस्टमध्ये ती लिहिते,
'तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आलीए पण आता ती थांबवुया. काय? त्याच्या धर्मामुळे, त्याच्या non conventional Hero looks मुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहीले आहेत. मी त्याची fan आहे कळल्यावर अनेक जणांनी मला unfollow केलं. याहून बालिश प्रकार मी पाहीला नाही. असो. मला वाटतं या द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतःला त्याच्याशी compare करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही!!! सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना Theatre मध्ये आणणे हे हाच करू जाणे! स्वतःच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो. उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए! पन्नाशी नंतर retirement चे plans करून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया! तुमच्या ५७ व्या वर्षी जर तुम्ही २०-२२ वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला! बाकी…झूमे जो पठान मेरी जान,महफ़िल ही लूट जाए! You were, You are & You will be forever…Baazigar!
हेमांगीच्या या पोस्टवरुन समजतच आहे की ती शाहरुखची किती मोठी चाहती आहे. तसेच कमेंट मध्ये शाहरुखच्या विरोधात बोलणाऱ्यांनाही तिने सडेतोड उत्तरं दिली आहेत. त्याचे देशप्रेम त्याने अनेक सिनेमांमधून दाखवले आहे. पठाणमधूनही ते दिसते त्यामुळे सिनेमा पाहिला तर प्रश्नांची उत्तरं मिळतील असं तिने एका युझरला उत्तर दिलं आहे.
‘पठाण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘पठाण’ हा सिनेमा गत २५ जानेवारीला चित्रपटातगृहांत धडकला आणि रिलीज होताच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आग लावली. शाहरूखचा सिनेमा त्सुनामीच्या वेगाने कमाई करतोय. अगदी रिलीजनंतरच्या चारच दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २०० कोटींचा आकडा पार केला आहे. विदेशात हा आकडा ४०० कोटींवर गेला आहे.