Join us

"हा हिंदीत कसं काम करेल, असं वाटलेलं पण...", गौरव मोरेसाठी हेमांगी कवीची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:41 IST

गौरव मोरेचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी अभिनेत्री हेमांगी कवीने खास पोस्ट शेअर केली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून अनेक कलाकरांना त्यांचं टॅलेंट दाखवून लोकप्रियता मिळवण्याची संधी मिळाली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे गौरव मोरे. फिल्टरपाड्याच्या बच्चनने मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात नाव कमावलं. गौरव मोरेचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी अभिनेत्री हेमांगी कवीने खास पोस्ट शेअर केली आहे. 

हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती गौरवची रुम दाखवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने गौरवसाठी शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आहे. 

गौरी, आपण २०१८ मध्ये एका चित्रपटात काम केलं होतं. तेव्हा तुझ्यातला हा ‘spark’ मी खरंच notice नव्हता केला! तेव्हा सिद्धार्थ जाधव म्हणाला होता “कमाल पोरगा आहे हा, बघशील तू” आणि आज मी त्याचे शब्द खरे झालेले बघतेय! हास्यजत्रा काय, चित्रपट काय तू धम्माल उडवलीस! 

मग आपण एकत्र काम केलं Sony tv च्या Madness Machayenge मध्ये तेव्हा ही मला धाकधूक होती हा हिंदीत कसं करेल, याचं हिंदी बरं असेल का ह्यांव अन् त्यांव! पण भावा…. तू आलास, तू पाहिलंस आणि तू भेंडी जिंकलास!!! तू तिथं दाणादाण उडवलीस, सगळ्यांचा लाडका झालास! हे सगळं पाहताना मात्र मला इतका आनंद, गर्व वाटत होता काय सांगू तुला? आता मी खात्रीने सांगू शकते “हा मुलगा कमाल आहे, हा कोणत्याही भाषेत कुठेही कमालच करेल!”

तू माझा आवडता आहेस, लाडका आहेस, आता तुला कुणीच वाचवू शकत नाही माझ्यापासून! 🤗😝😍वाढदिवसाच्या तुला खूप शुभेच्छा बच्ची!

Happy Birthday Gaurav More! ❤️❤️❤️

हेमांगीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत गौरव मोरेचं कौतुक केलं आहे. तसंच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.  

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारहेमांगी कवी