उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (hemangi kavi). समाजात असो वा कलाविश्वात कोणत्याही ठिकाणी एखादी घटना घडली तर हेमांगी त्यावर उघडपणे भाष्य करत असते. यात बऱ्याचदा तिला आलेल्या आलेले अनुभवही ती चाहत्यांसोबत शेअर करते. यावेळी तिने सिनेमा पाहता तिला आलेला अनुभव सांगितला आहे.
हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिची प्रत्येक पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. यावेळी तिने सिनेमा पाहण्यासाठी गेली होती. मात्र, तिला नीट सिनेमा पाहताच आला नाही. या मागचं कारण तिने सांगितलं असून चाळीशीनंतर कशी अवस्था होते हे तिने या व्हिडीओतून सांगितलं आहे.
अलिकडेच हेमांगी एक सिनेमा पाहण्यासाठी गेली होती. मात्र, हा सिनेमा थ्रीडी असल्यामुळे थिएटरमध्ये तिला काळ्या रंगाचा थ्रीडीचा चष्मा देण्यात आला होता. मात्र, या गॉगलमुळेच तिची खरी पंचाईत झाली होती. हेमांगीला चष्मा असल्यामुळे तिला हा गॉगल लावताना अडचण येत होती. इतकंच नाही तर वयाच्या चाळीशीनंतर ही समस्या निर्माण झाल्याचं तिने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.
सुरुवातील हेमांगीने मोठ्या उत्साहात थ्रीडी गॉगल लावला. पण, तिला काही सिनेमा पाहता येईना. मग तिने तिचा नेहमीच्या वापरातील चष्मा लावला तरी तिला सिनेमा दिसेना. मग, तिने शक्कल लढवत चष्मावर थ्रीडी गॉगल लावला. पण, तरीदेखील तिला सिनेमा नीटसा दिसत नव्हता. त्यामुळे हेमांगी प्रचंड वैतागली होती. त्यानंतर 'चाळिशीनंतरच्या अडचणी' असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला. तसंच कॅप्शनमध्ये 'दुख, दर्द, पीडा! पण काही हरकत नाही या सगळ्यापेक्षा चित्रपट जास्त त्रासदायक होता. कोणता होता तो चित्रपट ओळखा पाहू?', असं तिने म्हटलं आहे. दरम्यान, हेमांगीने या सिनेमाचं नाव ओळखा म्हटल्यावर अनेकांनी आदिपुरुष या सिनेमाचं नाव घेतलं आहे. तर, काही जणांनी खरोखर चष्मा असलेल्या लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो असं म्हणत तिला दुजोरा दिला आहे.