Join us

Agree Love Your Body, पण लोकांना दाखवायची गरजच काय म्हणणाऱ्या युजरला हेमांगी कवीने दिले सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 5:44 PM

सध्या हेमांगीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टची सध्या जबरस्त चर्चा आहे. निर्माता-दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी हेमांगीच्या या पोस्टला पाठींबा दिलाय.

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत. हेमांगी सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. आपले विचार मतं ती सोशल मीडियावर रोखठोक मांडताना दिसते.

सध्या हेमांगीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टची सध्या जबरस्त चर्चा आहे. निर्माता-दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी हेमांगीच्या या पोस्टला पाठींबा दिलाय. मराठी चित्रपटसृष्टीतील अन्य कलाकारांनीही हेमांगीच्या या ‘बेधडक’ पोस्टचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर अनेकदा कलाकारांचे काही फोटो नेटीझन्सच्या पसंतीस न उतरल्यामुळे ते ट्रोल करायला सुरुवात करतात. पण या ट्रोलिंगचा हेमांगी कवीलाही फरक पडत नाही. तिथेच सडेतोड उत्तर देत ट्रोल करणाऱ्यांची तिने अनेकदा बोलती बंद केली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून हेमांगी फिटनेसकडे अधिक लक्ष देत आहे. नित्यनियमाने ती योगा, वर्कआऊट करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच हेमांगीने तिचा वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली होती.मात्र काहींना तिचा हा अंदाज रुचला नाही. त्यामुळे या व्हिडीओवर चाहत्याने हेमांगीला कमेंट करत म्हटले की, ''Agree Love u r body पण लोकांना दाखवायची गरजच काय ''या कमेंटवर हेमांगी आधीच चाहत्यांनी आपापले मत कळवत कमेंट करणाऱ्याला चोख उत्तर दिले होते.

कमेंट वाचून एका युजरने रिप्लाय दिला की, ''बघणाऱ्याच्या नजरा वाईट असतात. वाईट नजरेने पाहाल तर वाईटच दिसेल.चांगल्या नजरेने बघा प्रत्येक व्यक्ती सुंदर दिसेल.'' अशा अनेक कमेंट यावर पाहायला मिळाल्या. यानंतर हेमांगीनेही रोखठोक शब्दात त्या युजरला रिप्लाय दिला. यात तिने म्हटले होते की, Agree तुम्हांला पटलेलं नाहीए पण इथे कमेंट करायची गरजच काय?

टॅग्स :हेमांगी कवी