मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi ) सोशल नेटवर्किंगवर कायम चर्चेत असते. अगदी स्त्री-पुरूष समानतेपासून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देण्यापर्यंत सारं काही हेमांगी बिनधास्त अगदी प्रो-स्टाईलनं करते. साहजिकचं चर्चा होणार. तूर्तास चर्चा होतेय ती हेमांगीच्या नव्या पोस्टची. झुंड ( Jhund) हा सिनेमा, या सिनेमातील बच्चन साहेब ( Amitabh Bachchan)आणि सिनेमातील बच्चन साहेबांची बायको साकारणारी छाया कदम (Chhaya Kadam) यांच्यासाठी हेमांगीने एक खास पोस्ट लिहिली आहे. ‘झुंड’ या सिनेमात छाया कदम यांनी अमिताभ बच्चन यांच्या बायकोचा रोल साकारला आहे. हेमांगीने याच छाया कदम यांच्यासाठी ही पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय.
ती लिहिते...
प्रत्येक actor ला वाटत असतं की आयुष्यात साला एकदा तरी 'बच्चन' सोबत काम करायला मिळावं. सुप्त इच्छा कधीतरी पूर्ण होऊ देत यासाठी प्रार्थना करत असतो. किती स्वप्न पडतात की आपण बच्चन सोबत scene करतोय याची. निदान मला तरी पडतात. माझ्यासाठी स्वप्नवतच आहे ते. पण #झुंड च्या निमित्ताने Chhaya Kadam तू ते खरं करून दाखवलंस. एक scene मिळावा किंवा एक dialouge ही चालेल किंवा passing सुद्धा मिळालं त्यांच्या frame मध्ये तरी भरून पावू असं वाटतं. पण तू चक्क त्यांच्या बायकोचा रोल किंवा partner म्हणू शकतो असा रोल केलास. तेवढ्याच ताकदीनं उभी राहिलीस. कुठून आणलंस एवढं बळ यार? खरंच एक अभिनेत्री म्हणून, एक मैत्रीण म्हणून तुझा अभिमान वाटतो आणि तुझ्या संपूर्ण अभिनय प्रवासाचं कौतुक ही. और क्या चाहीए! कसलं भारी वाटतंय काय सांगू यार. यासाठी Nagraj Manjule चे आभार मानेन की त्याने तुझ्यातल्या कसदार अभिनेत्रीवर, मैत्रिणीवर एवढा विश्वास दाखवला! किती conviction असेल त्याला तुला cast करायचं! नाहीतर इथं बरेच जण नुसतंच 'तू किती भारी अभिनेत्री आहेस, कमाल मैत्रीण आहेस' असं सांत्वनपर बोलून 'अगं, producer ला, प्रथितयश actor समोर अमुक अमुक अभिनेत्रीच cast करायचीय गं, माझ्या हातात असतं ना तर तुलाच cast केलं असतं' हे 'बच्चन' देऊन पळ काढतात. असो, तुला त्यांच्या सोबत काम करताना पाहून वाटलं साला आपणच काम करतोय. क्या बात है... Proud proud and extremely happy! Love u रे! आणि माझी तुझ्या सोबत काम करायची इच्छा एक नाहीतर दोन चित्रपटांमुळे पूर्ण झाली म्हणून मज्जा! Yay!