धर्मेंद्रच्या कुटूंबाबद्दल लोकांना बरीचशी माहिती आहे, पण प्रसिद्धीपासून दूर असलेल्या त्याच्या दोन सूनांविषयी फारच कमी माहिती लोकांना माहिती असेल. धर्मेंद्रची मोठी सून पूजा देओल सनी देओलची पत्नी आहे. लहान सूनेचे नाव तान्या देओल आहे ती बॉबी देओलची पत्नी आहे. मात्र, इतक्या वर्षांनंतरही देओल कुटुंबातील या दोन सूना कधीच एकत्र दिसल्या नाहीत. आपण विचार करीत असाल की कदाचित जेठानी-देवरानी यांच्यात काही बिनसले असणार पण तसेही नाही.
धर्मेंद्र यांनी अगदी लहान वयातच प्रकाश कौरशी लग्न केले. या दोघांना 4 मुले, दोन मुलं आणि दोन मुली आहेत. दोन्ही मुलांनी बॉलिवूडचा मार्ग पकडला, तर मुली अजिता-विजयेता लाइमलाइटपासून परदेशात राहतात.
धर्मेंद्र यांच्या मोठ्या सूनेला म्हणजेच पूजा देओल लिहीण्याची आवडत आहे. 'यमला पगला दिवाना' या सिनेमाची स्टोरी लाईनही त्यांनीच लिहिली.पण पूजा देओलला चर्चेत राहणे अजिबात आवडत नाही. ती आपला बहुतेक वेळ घरात सासू प्रकाश कौरसहच घालवते.अलीकडेच मुलगा करण देओलचा पहिला सिनेमा 'पल पल दिल के पास ’ सिनेमाच्या स्क्रिनिंगला हजरी लावली होती.तेव्हा एरव्ही कधीच समोर न येणारी पूजा देओल केवळ आपल्या मुलाखातर मीडिया समोर आली होती. सनी देओल आणि पूजा देओलचे १९८४ मध्ये लग्न झाले आहे.
याउलट तान्या देओल आहे. तान्या एक यशस्वी बिझनेसवुमन आहे.तान्या 'द गुड अर्थ' या फर्निचर ब्रँडची मालकीण आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी तिचे क्लायंट आहेत. तान्याला देखील फारसे लाइमलाइटमध्ये राहायला आवडत नाही. ती देखील पूजा देओलप्रमाणे स्वतःला या चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून स्वतःला दूरच ठेवते.
सार्वजनिक कार्यक्रमातही कधीच तान्या बॉबीसह दिसत नाही.बॉबी देओल आणि तान्या १९९६ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुले असून बॉबी अनेकवेळा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याच्या फॅमिलीचे फोटो पोस्ट करत असतो.