Join us

वयाच्या ३६ व्या वर्षी अभिनेत्रीने संपवले होते आयुष्य, यशशिखरावर असतानाच उचलले होते टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 12:13 PM

 'द डर्टी पिक्चर' सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित होता.  २०११ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामध्ये विद्या बालन मुख्य भूमिकेत होती.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार  सिल्क स्मिताचे खरे नाव विजयालक्ष्मी होते.लोक तिचे बी-ग्रेड सिनेमा पाहण्यासाठी अक्षरक्षः तासन तास रांगा लावायचे. जीवंतपणी सिल्क स्मिताला जो सन्मान मिळायला हवा होता तो कधीच मिळाला नाही. चौथी पर्यंतच ती शिणक्ष घेवू शकली. फार हलाखीचे जगणं ती जगत होती. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे सिल्कने अगदी लहान वयात काम करायला सुरूवात केली होती. मात्र घरच्यांच्या जाचाला कंटाळून सिल्कने घरही सोडले आणि एक मेकअप आर्टिस्ट म्हणूनही तिने काम केले होते. 

सिल्कचा मृत्यु कसा झाला या विषयी आजही गुढ कायमच आहे. 'लक्ष्मी'ने सिनेमांमध्ये नशीब आजमावले. कालांतराने तिला सिनेमात काम करायच्या संधी मिळू लागल्या होत्या. प्रकाशझोतात येत असताना तिने तिच्या नावात बदल करून 'लक्ष्मी' ऐवजी 'सिल्क स्मिता' केले. अभिनय क्षेत्रात 'लक्ष्मी' ही सिल्क स्मिता म्हणून ओळखली जावू लागली. नंतर अनेक अ़डल्ट सिनेमात ती झळकली. तिची लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांची तिच्यापुढे रांगा लागायच्या. प्रत्येक निर्मात्याची सिल्कने त्यांच्या सिनेमात काम करावे अशी इच्छा असायची. 

सिल्कने तिच्या कारकिर्दीत खूप काम केले, पैसा प्रसिद्धी तिने मिळवली. निर्माती म्हणूनही ती सिनेमात पैसे गुंतवायची. मात्र तिला त्यात फारसे यश मिळाले नाही. निर्माती बनल्यानंतर तिला प्रचंड तोटाही सहन करावा लागला. याच गोष्टीचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाला आणि ती मानसिकदृष्ट्या खचली गेली. 1979 मध्ये, 'इनाये थेडी' मल्याळम चित्रपटात प्रथमचच लोकांनी तिला पडद्यावर पाहिले होते. स्मिताच्या घायाळ करणा-या अदा पाहून चाहतेही फुल ऑन फिदा व्हायचे. दहा वर्षांच्या करिअरमध्ये तिने सुमारे 500  सिनेमात काम केले होते.

'वांडीचक्रम' 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या कारकिर्दीतील सुपरहिट सिनेमा ठरला. कमल हासन, रजनीकांत आणि चिरंजीवी सारख्या मोठ्या स्टार्सबरोबर तिने काम केले.

 

 

वयाच्या 36 व्या वर्षी 1996 मध्ये मात्र तिचा मृत्यू झाला. सिल्क दाक्षिणात्या इंडस्ट्रीत खूप बोल्ड अभिनेत्री होती.  'द डर्टी पिक्चर' सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित होता.  २०११ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामध्ये विद्या बालन मुख्य भूमिकेत होती.

टॅग्स :विद्या बालन