लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'लुका छुपी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली. या सिनेमातील कॉमेडी ड्रामाला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात कार्तिक आर्यन व कृति सेनॉन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील कार्तिक आर्यनच्या कामाचे खूप कौतूक झाले. मात्र लुकाछुपीच्या यशाचे संपूर्ण श्रेय कार्तिकला मिळाल्यामुळे कृति सेनॉन नाराज झाली आहे.
आज तकच्या रिपोर्टनुसार एका मुलाखतीत कृति सेनॉनने सांगितले की, 'चित्रपटात मुख्य भूमिका करत असलेल्या अभिनेत्रीच्या कामांकडे दुर्लक्ष करणे, हे खूप आधीपासून चालत आलेले आहे आणि ही खूप चुकीची बाब आहे. मला आनंद होत आहे की या गोष्टींवर किमान चर्चा तरी होत आहे. जर चित्रपटात अभिनेत्रींच्या भूमिकेला खूप काही करण्याचा स्कोप नसेल आणि केवळ अभिनेत्याबद्दल बोलणे तार्किक आहे. मात्र जेव्हा अभिनेता व अभिनेत्री दोघांच्या कौशल्यावर जर चित्रपट चालत असेल तर समान पातळीवर क्रेडिट मिळाले पाहिजे. प्रत्येक जण क्रेडिटसाठी योग्य आहे.'
ती म्हणाली की, 'अशी बरेच प्रकरणे समोर आली आहेत ज्यात अभिनेत्रीला तिच्या बरोबरीच्या अभिनेत्याला तिच्यापेक्षा जास्त मानधन दिले जाते. माझे मत आहे की मानधन दोन गोष्टी पाहून दिल्या पाहिजेत. त्यातील एक म्हणजे चित्रपटातील तुमची भूमिका आणि प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणण्याची क्षमता. गेल्या काही वर्षात अशीही उदाहरणे आहेत ज्यात अभिनेत्रीला अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन दिले गेले आहे. माझ्यासाठी पैसे महत्त्वाचे आहेत. मात्र स्क्रीप्टदेखील माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे.'