Join us

'कानपुर वाले खुराणाज'मध्ये हिना खान आणि मोहित मलिकची होणार एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 17:33 IST

‘कसौटी जिंदगी की’ मध्ये कोमोलिकाची भूमिका करणारी हिना खान आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’मध्ये सिकंदरची भूमिका करणारा मोहित मलिक यांनी ‘कानपुर वाले खुराणाज्‌’मध्ये उपस्थिती लावली होती.

रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्यासाठी कॉमेडीयन सुनील ग्रोवर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. ह्या शोमध्ये बॉलीवूडमधील सुपरस्टार्स भेट देतात. बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान या शोचा पहिला पाहुणा होता. संकल्पना कपिल शर्मा शो सारखीच असून कपिल शर्माची  एक्स गर्लफ्रेंड आणि एक्स क्रिएटिव हेड प्रीति सिमोसच निर्मिती केली आहे. केवळ 12-15 एपिसोडची ही सिरीज असणार आहे. आता या शोमध्ये नवीन पाहुणे हजेरी लावणार आहे.

स्टारप्लसवरील सुंदर खलनायिका कोमोलिका फेम हिना खान आणि सुपरस्टार गायक सिकंदर यांनी स्टारप्लसवरील ‘कानपुर वाले खुराणाज्‌’सोबत वर्षाची सांगता केली. ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये कोमोलिकाची भूमिका करणारी हिना खान आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’मध्ये सिकंदरची भूमिका करणारा मोहित मलिक यांनी ‘कानपुर वाले खुराणाज्‌’मध्ये उपस्थिती लावली होती.

सूत्रांनुसार, हिना खान आणि मोहित मलिक हे खास अतिथी म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी आपली विनोदी बाजू दाखवली. ह्या संध्येमध्ये सर्वांनी खूप धम्माल केली. त्यांनाही खूप मजा आली. स्टारप्लसवरील ‘कानपुर वाले खुराणाज्‌’मध्ये सुंदर हिना खान आणि देखण्या मोहित मलिक यांना पाहायला खूप मजा येईल. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदा खान दिसणार असून यात ती सुनिल ग्रोव्हरच्या पत्नीच्या अगदी वेगळ्‌या रूपात दिसून येत आहे. 

सुनिल ग्रोवर पाठोपाठ कपिल शर्माही दणक्यात कमबॅक करणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून रंगली होती. सोनी टीव्हीनेही या वृत्ताला काही आठवड्यांपूर्वीच दुजोरा दिला होता. या कार्यक्रमाची तयारीही सुरू झाली असून या महिन्यातच कपिल त्याच्या शोसह परतणार असल्याचे म्हटले जात आहे.   

टॅग्स :सुनील ग्रोव्हरकानपुरवाले खुराणाज्