Join us

ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानसाठी बॉयफ्रेंड रॉकीची पोस्ट; म्हणाला, "आयुष्याला अर्थ..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 9:53 AM

एकीकडे हिना कॅन्सरशी लढा देत आहे तर दुसरीकडे बॉयफ्रेंडने शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेत्री हिना खानला (Hina Khan) ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याचं समजल्यावर कुटुंबासह चाहत्यांना धक्का बसला आहे. कॅन्सरचा सामना करण्यासाठी हिनाला सर्वजण धीर देत आहेत. हिनाता बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालही तिच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. गेल्या काही वर्षांपासून हिना आणि रॉकी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. रॉकीने नुकतीच हिनासाठी एक खास गोष्ट केली असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

हिना खान कॅन्सरशी दोन हात करताना जास्तीत जास्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावरुन ती तिच्या या प्रवासाची माहिती देत असते तेव्हा तिची जिद्द वाखणण्याजोगी आहे. हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालने तिचे तीन फोटो पोस्ट केले आहेत. तो लिहितो, "जेव्हा ती हसते तेव्हा सगळं प्रकाशमय होतं... जेव्हा ती आनंदी असते तेव्हा आयुष्याला अर्थ राहतो...जेव्हा ती माझ्यासोबत असते...मी आणखी जास्त जगतो...जेव्हा मी तिच्यासोबत असतो...मला दुसरं काहीही नको असतं...आज तिचा आवडता पदार्थ बनवला..वीकेंड स्पेशल फॉर माय लव्ह."

रॉकी जैस्वालच्या या पोस्टवर चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलं आहे. या कठीण परिस्थितीत तो ज्याप्रकारे हिनाची साथ देतोय यालाच परफेक्ट जीवनसाथी म्हणतात. 'तू तिची काळजी घेतोय बघून खूप आनंद झाला ','ती खरोखरंच नशिबवान आहे की तुझ्यासारखा पार्टनर सोबत आहे' अशा कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच हिनाने कॅन्सरमध्ये केस गळण्याआधीच ते कापले. नंतर त्रास होऊ नये म्हणून तिने मनावर दगड ठेवत आधीच हे पाऊल उचललं. याचा व्हिडिओ तिने शेअर केला होता. सध्या सगळे हिना लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

टॅग्स :हिना खानस्तनाचा कर्करोगसोशल मीडियाटिव्ही कलाकार