Join us

"सावळ्या रंगामुळे मला रिजेक्ट केलं"; हिना खानला करावा लागला वर्णभेदाचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:21 AM

Hina khan: सुरुवातीच्या काळात अभिनेत्री प्रियांका चोप्रालादेखील या दिव्यातून जावं लागलं होतं. त्यानंतर आता हिना खान हिलादेखील असाच अनुभव आला आहे.

ठळक मुद्देकलाविश्वामध्येच तिला सावळ्या रंगामुळे डावलण्यात आल्याचं समोर आलं आहे.

आतापर्यंत कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीच्या काळात अभिनेत्री प्रियांका चोप्रालादेखील या दिव्यातून जावं लागलं होतं. त्यानंतर आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान हिलादेखील असाच अनुभव आला आहे. साधारणपणे विदेशामध्ये वर्णभेदाचा प्रकार घडल्याचं आपल्या ऐकिवात येतं. मात्र, हिनाला आपल्याच देशात हा अनुभव आला आहे. विशेष म्हणजे ती कार्यरत असलेल्या कलाविश्वामध्येच तिला सावळ्या रंगामुळे डावलण्यात आल्याचं समोर आलं आहे. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीमध्ये तिने याविषयी भाष्य केलं आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली हिना अलिकडेच 'मैं भी बर्बाद'  या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली होती. या नव्या प्रोजेक्टच्या निमित्ताने तिने 'ई टाइम्स'ला मुलाखत दिली. यावेळी  मला सावळ्या रंगामुळे काश्मिरी मुलीची भूमिका न मिळाल्याचं तिने सांगितलं.

'मी राज कुंद्रासारखी दिसते का?'; 'त्या' प्रश्नावर भडकली शिल्पा शेट्टी

'सावळ्या रंगामुळे अनेकदा मला रिजेक्शनचा सामना करावा लागला. मला एका चित्रपटाची ऑफर आली होती. परंतु, केवळ माझा रंग सावळा असल्यामुळे मला या चित्रपटात काश्मिरी मुलीची भूमिका मिळाली नाही', असं ती या मुलाखतीत म्हणाली.

Hottest family! बोल्डनेसच्या बाबतीत सनी लिओनीची वहिनीही करते तिच्यावर मात

"मी त्या चित्रपटाचं नाव नाही सांगणार पण केवळ माझ्या रंगामुळे मला त्या प्रोजेक्टसाठी नाकारण्यात आलं.  मी काश्मिरी मुलीप्रमाणे दिसत नाही. किंवा, माझा रंग त्यांच्याप्रमाणे गोरा नव्हता. मी सावळी होते", असं हिना खान म्हणाली.

दरम्यान, हिना खानने छोट्या पडदा गाजवल्यानंतर तिने विक्रम भट्टच्या हॅक्ड या सस्पेंस थ्रिलर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत मोहित मल्होत्रा आणि रोहन शाह यांनी स्क्रीन शेअर केली होती. 

टॅग्स :हिना खानसिनेमासेलिब्रिटी