ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रेहमान यांचा एक लाईव्ह कॉन्सर्ट नुकताच लंडन येथे पार पडला. अत्यंत मितभाषी असलेल्या ए आर रेहमान यांच्या या कॉन्सर्टवर चाहते मात्र प्रचंड नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर तर ए आर रेहमान यांच्यावरुन चाहत्यांमध्येच सोशल वॉर सुरु झालं आहे. कॉन्सर्टला हजेरी लावलेल्या अनेकांनी ए आर रेहमान यांनी जास्तीत जास्त तामिळ गाणी गायली असल्याचं सांगत टीका केली आहे. विशेष म्हणजे ए आर रेहमान स्वत: तामिळ असून त्यांनी तामिळ भाषीतील अनेक गाणी कम्पोज केली आहे. मात्र असं असतानाही चाहत्यांनी त्याकडे मात्र दुर्लक्ष केला असल्याचा आरोप रेहमान यांच्या समर्थकांनी केला आहे.
आणखी वाचा
काही दिवसांपुर्वी लंडनमधील वेम्बली शहरात त्यांचा एक लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला. कॉन्सर्ट चांगला होता, मात्र कॉन्सर्टला हजेरी लावणारे अनेक जण नाराज होऊन निघून गेले. ए आर रेहमान यांनी फक्त तामिळ भाषेतील गाणीच गायली असा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे काहींनी अर्ध्यातच कॉन्सर्ट सोडून जाणं पसंद केलं.