Join us  

‘बेगम जान’च्या सेटवर होली साँग शूट!!

By admin | Published: March 15, 2017 1:33 AM

विद्या बालनचा ‘बेगम जान’ हा आगामी सिनेमा पाहण्यास तुम्ही आम्ही सगळेच उत्सुक आहोत. अलीकडे या चित्रपटाची काही पोस्टर्स जारी केली गेलीत.

विद्या बालनचा ‘बेगम जान’ हा आगामी सिनेमा पाहण्यास तुम्ही आम्ही सगळेच उत्सुक आहोत. अलीकडे या चित्रपटाची काही पोस्टर्स जारी केली गेलीत. ती पाहून तर ‘बेगम जान’बद्दलची उत्सुकता आणखीच वाढली आहे. त्यातच या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो समोर आले आहेत. होय, या फोटोत ‘बेगम जान’च्या सेटवर विद्या व ‘बेगम जान’ची संपूर्ण स्टारकास्ट धम्माल होळी खेळताना दिसतेय. ‘बेगम जान’च्या एका होली साँगचे शूटिंग अलीकडेच पार पडले. त्याचेच हे फोटो. होळीवर आधारित गाणे म्हटल्यानंतर रंग उधळले जाणारच. शूटिंगच्या बहाण्याने रंग खेळण्याची संधी कोण कशी चुकवणार? मग काय, ‘बेगम जान’च्या सेटवर मस्तपैकी होळी खेळली गेली. ‘बेगम जान’मधील होळीवरचे हे गाणे अन्नू मलिक यांनी कम्पोज केले आहे. हा चित्रपट ‘राजकहिनी’ या बंगाली चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाच्या बंगाली व्हर्जनमध्ये रितुपर्णा सेनगुप्ता दिसली होती. हिंदी रिमेकमध्ये ही भूमिका विद्या साकारताना दिसणार आहे. स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या फाळणीकाळातील ही कथा आहे. चित्रपटाची कथा एका कुंठणखान्याच्या अवतीभवती फिरणारी आहे. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान देहविक्रय व्यवसायात फसलेल्या महिलांच्या आयुष्यातील उलथापालथ या चित्रपटातून पडद्यावर दिसणार आहे. सर्वांत विशेष म्हणजे, यात एक नाही, दोन नाही तर तब्बल ११ अभिनेत्री दिसतील. विद्या बालन, नसिरुद्दीन शहा, रजत कपूर व गौहर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बेगम जान चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारविजेता दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी याने केले असून, तो १४ एप्रिलला रिलीज केला जाईल.