ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक कारणांमुळे चर्चेत होता. रामायणावर आधारित असलेल्या 'आदिपुरुष'वर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली होती. या चित्रपटातील डायलॉगवरही आक्षेप घेण्यात आला होता. वाद निर्माण झाल्यामुळे 'आदिपुरुष'मधील डायलॉग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता प्रसिद्ध इंडियन-अमेरिकन दिग्दर्शक मुकेश मोदी यांनीही 'आदिपुरुष' चित्रपटावर भाष्य केलं आहे.
'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश मोदींनी 'आदिपुरुष' चित्रपटावरुन सुरू असलेल्या वादाबाबत मत मांडलं. ते म्हणाले, "या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आपल्या धर्मावर नकळतपणे डाग लावण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला गेला आहे." या मुलाखतीत त्यांनी चित्रपटात घेण्यात आलेल्या लिबर्टीबाबतही भाष्य केलं.
"'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर पतीचं निधन झालेल्या महिलेने...", केदार शिंदेंनी सांगितला 'तो' प्रसंग
"लिबर्टीची मुभा आहे म्हणून लोक काहीही करत आहेत. पण, कोणीही धर्मग्रंथांचा चुकीचा वापर नाही केला पाहिजे. शेवटी, तुम्ही चर्चेत असाल पण लोक तुम्हाला पसंत करणार नाहीत. धर्माबरोबर चुकीचं वागण्याचा कोणालाही हक्क नाही," असं मुकेश मोदी म्हणाले.
दोन लग्नांनंतरही 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेले धर्मेंद्र, हेमा मालिनींना कळलं अन्...
'आदिपुरुष' चित्रपट टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत होता. यातील व्हिएफएक्सवरुनही चित्रपटाला ट्रोल करण्यात आलं होतं. ६०० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. परंतु, प्रेक्षकांच्या अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करू शकला नाही. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, देवदत्त नागे, सैफ अली खान हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.