Join us

अविश्वसनीय! ‘100 Years’ हा सिनेमा बघण्यासाठी तुम्हाला 93 वर्ष वाट बघावी लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 8:00 AM

100 Years – The Movie You Will Never See :विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे! ‘100 इयर्स- द मुव्ही विल नेव्हर सी’ हा सिनेमा 2015 मध्ये बनवला घेतला गेला आणि तो 2115 साली रिलीज केला जाणार आहे.

एक सिनेमा बनतोय आणि तो पाहण्यासाठी तुम्हाला 93 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार. आपल्यापैकी बहुतांश लोक कदाचित इच्छा असूनही हा सिनेमा बघू शकणार नाही. कारण इतकी वर्ष कदाचित आपण जिवंत नसू. विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. ‘100 इयर्स- द मुव्ही विल नेव्हर सी’  (100 Years – The Movie You Will Never See) हा असाच गजब सिनेमा आहे.‘100 इयर्स- द मुव्ही विल नेव्हर सी’ हा सिनेमा 2015 मध्ये बनवला घेतला गेला आणि तो 2115 साली रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट जॉन मालकोविच यांनी लिहिली आहे आणि ते या चित्रपटात कामही करत आहेत. रॉबर्ट रॉड्रिग्ज या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

युनिक आयडिया कुठून सुचली माहितीये?‘100 इयर्स- द मुव्ही विल नेव्हर सी’ या गजब चित्रपटाची आयडिया कुठून सुचली माहितीये? तर एका खास दारूवरून. होय, लुई 13 (Louis XIII) नावाची एक खास ब्रांडी आहे. ती तयार होण्यासाठी 100 वर्षांचा काळ लागतो. याच ब्रांडीवरून मेकर्सला ‘100 इयर्स- द मुव्ही विल नेव्हर सी’ या चित्रपटाचा प्लॉट मिळाला. कारण 100 वर्षांत फक्त एक दारूची बाटली तयार होते. हीच युनिक आयडिया घेऊन मेकर्सनी ‘100 इयर्स- द मुव्ही विल नेव्हर सी’ हा सिनेमा बनवायला घेतला.

म्हणे, हायटेक तिजोरीत ठेवणार?होय, हा चित्रपट तयार झाला की तो एका हायटेक तिजोरी लपवून ठेवला जाणार आहे. ही तिजोरी बुलेटप्रूफ असेल आणि 100 वर्षांनंतर आपोआप उघडेल. दिग्दर्शक रॉड्रिग्ज यांना 100 वर्षानंतर एन्जॉय केला जाईल, असा सिनेमा बनवायचा होता. ते म्हणतात, माझे पणतु कदाचित माझं काम पाहू शकतील. कदाचित तोपर्यंत माझा क्लोन सुद्धा तयार होईल आणि तो या चित्रपटात त्यांच्यासोबत पाहू शकेल. या चित्रपटात काय पाहायला मिळणार, हेही सीक्रेट आहे. अद्याप कुणालाही याचा सुगावा लागलेला नाही. या चित्रपटाचे तीन वेगवेगळे ट्रेलर रिलीज झाले आहेत. पण यापैकी एकही ट्रेलर प्रत्यक्ष चित्रपटाच्या फुटेजचे नाही. या चित्रपटात भविष्याची कहानी दाखवली जाईल, केवळ इतकाच अंदाज ट्रेलर बघून येतो. पण नेमकी कथा काय, हे मोठ्ठ सीक्रेट आहे.

अनेक प्रश्न, अनेक शंका?या चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हापासून यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. हा चित्रपट चालणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण 93 वर्षांत जग किती बदलेल? जग तेव्हा कसं असेल? त्या काळात हा सिनेमा कुणी पाहणार की नाही? असे अनेक प्रश्नही आहेतच.

टॅग्स :हॉलिवूड