Join us

धनुषचा धमाका; १६०० कोटींच्या हॉलिवूडपटात झळकला 'साउथ स्टार', एका सीनवर ३१९ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 7:08 PM

धनुष स्टारर 'द ग्रे मॅन' अँथनी आणि जो रुसो यांनी या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. यासाठी नेटफ्लिक्सने त्याना १६०० कोटी रुपये दिले.

सुपरस्टार धनुष (Dhanush)  त्याच्या हॉलिवूड डेब्यूमुळे सध्या चर्चेत आहे. धनुषने अ‍ॅव्हेंजर्सची प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी रुसो ब्रदर्स(Russo Brothers) चा नवीन चित्रपट 'द ग्रे मॅन' (The Gray Man)मध्ये झळकणार आहे. हा नेटफ्लिक्सचा सर्वात महागडा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.   

इतका आहे सिनेमाचा बजेट'द ग्रे मॅन'  (The Gray Man)हा चित्रपट अँथनी आणि जो रुसो(Anthony and Joe Russo)  यांनी मिळून लिहिला आहे. यासोबतच दोघांनी याची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. यासाठी नेटफ्लिक्सने त्यांना २०० मिलियन म्हणजेच सुमारे 1600 कोटी रुपये दिले आहेत. दोघांनीही जगभरातील अनेक सुंदर ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. शूटिंगबद्दल बोलताना जो रुसो म्हणाला, 'त्याने आमचा जीव जवळजवळ घेतला.'

एक सीनसाठी लागले ४० मिलियन या चित्रपटाचा एक अ‍ॅक्शन सीन तयार करण्यासाठी जवळपास एक महिना लागला. यात हॉलिवूड अभिनेता रायन गॉस्लिंग मोठ्या बंदुकांसह, एक ट्राम कार प्रागच्या ओल्ड टाऊन क्वार्टरमध्ये फिरत असलेल्या मारेकरींच्या संपूर्ण सैन्याशी लढत असल्याचे चित्रित केले आहे. लढाईदरम्यान, रायनला दगडी बेंचला बांधले जाते. असा हा सीन आहे. हा सीन तयार करण्यासाठी सुमारे 40 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 319 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. 

'द ग्रे मॅन'  हा चित्रपट नेटफ्लिक्सचा सर्वात महागडा चित्रपट आहे. तो अमेरिकेतील काही चित्रपटगृहांमध्ये वीकेंडला रिलीज झाला आहे. जेम्स बाँड आणि मिशन इम्पॉसिबल प्रमाणे ही स्पाय फ्रँचायझी तयार आल्याचे समजते. 'द ग्रे मॅन' सोबत ही गुप्तचर फ्रेंचायझी वाढवण्याची रुसो ब्रदर्सचा प्लान असल्याचे सांगितले जात आहे. जर हा चित्रपट हिट झाला तर पुढे ग्रे मॅन युनिव्हर्सचे चित्रपट आणि टीव्ही मालिका येतील. आतापर्यंत हा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना धनुषचा अभिनय खूप आवडला आहे. दुसरीकडे, धनुषच्या कामाचे त्याचे सहकलाकार रायन आणि रेगे यांनीही कौतुक केले आहे. 

टॅग्स :धनुषहॉलिवूड