प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर लुआना एंड्रेड हिचं निधन झालं आहे. ती २९ वर्षांची होती. तिच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्लास्टिक सर्जरी करणं लुआनाच्या जीवावर बेतलं आहे. सर्जरीनंतर एकामागोमाग एक चार कार्डियक अरेस्ट आल्याने लुआनाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ब्राझिलियन अभिनेत्री लुआना हिने गुडघ्यांवर लिपोसक्शन सर्जरी(Liposuction Surgery) केली होती. पण, या सर्जरीमुळे तिला जीव गमवावा लागला आहे. सुंदर दिसण्याचा नादात केलेली सर्जरी लुआनाच्या जीवावर बेतली. या कॉस्मेटिक सर्जरी दरम्यान लुआनाला अनेक शारीरिक समस्या उद्भवल्या. एका मागोमाग एक चार कार्डियक अरेस्टमुळे तिचा जीव गेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सर्जरीनंतर जवळपास दीड तासांनी लुआनचं हृदय बंद पडलं होतं. त्यानंतर डॉक्टारांनी सर्जरी करणं थांबवलं होतं. लुआना पल्मनरी एम्बॉलिझम (Pulmonary Embolism) या आजाराशी सामना करत होती.
"कार्डियक अरेस्ट आल्यानंतर सर्जरी थांबविण्यात आली होती. लुआनाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. त्यानंतर तिला आयसीयूमध्ये हलविण्यात आलं होतं. पण, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला," असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.