Join us

4607_article

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2016 10:22 PM

बरेचसे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडूनही जीवनात यशस्वी झालेले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडणे हे चांगले आहे. कल्पना करा बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे पदवी नाही म्हणून जर त्यांच्या कंपनीच्या भागधारकांनी त्यांना नाकारले असते तर? उच्च शिक्षण हा यशस्वी होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यावरुन एक गोष्ट लक्षात येते शिक्षण आणि कौशल्य यांना जोडले जाऊ शकत नाही. त्यांनी केलेले परिश्रम आणि कामावरील निष्ठा त्यांना सर्वोच्च मार्गावर घेऊन गेली. शिक्षण अर्धवट सोडलेल्या यशस्वी लोकांची माहिती या ठिकाणी देत आहोत...

बरेचसे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडूनही जीवनात यशस्वी झालेले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडणे हे चांगले आहे. कल्पना करा बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे पदवी नाही म्हणून जर त्यांच्या कंपनीच्या भागधारकांनी त्यांना नाकारले असते तर? उच्च शिक्षण हा यशस्वी होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यावरुन एक गोष्ट लक्षात येते शिक्षण आणि कौशल्य यांना जोडले जाऊ शकत नाही. त्यांनी केलेले परिश्रम आणि कामावरील निष्ठा त्यांना सर्वोच्च मार्गावर घेऊन गेली. शिक्षण अर्धवट सोडलेल्या यशस्वी लोकांची माहिती या ठिकाणी देत आहोत...महाविद्यालयीन जीवनात दुसºया वर्षी शिक्षण अर्धवट सोडून बिल गेट्स यांनी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनीची सुरुवात केली. आपले मित्र पॉल अलेन यांच्यासोबत त्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ ची निर्मिती केली. हॉवर्डने त्यांना ‘हॉवर्डचा सर्वात यशस्वी गळालेला विद्यार्थी’ म्हणून त्यांना गौरवान्वित केले. तंत्रज्ञानातील विविध शोध आणि व्यावसायिक तंत्रामुळे ते आणि त्यांचे पार्टनर अ‍ॅलीन यांनी मायक्रोसॉफ्टला जगातील सर्वात मोठी कंपनी बनविली. फोर्ब्सच्या यादीनुसार बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.पालकांना अत्यंत महागडी ट्यूशन फी न भरता आल्याने स्टीव्ह जॉब्स यांना रीड महाविद्यालयातून सहा महिन्यानंतर आर्थिक कारणामुळे बाहेर पडावे लागले. जॉब्स हे उद्योजक आणि व्यावसायिक होते. त्याशिवाय अ‍ॅपल इनकॉर्पोरेशनचे सहसंस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांनी आयमॅक, आयट्यून्स, आयफोन, आयपॅड, अ‍ॅपल रिटेल स्टोअर्स विकसित केले. पिक्सर अ‍ॅनिमेशन स्टुडिओजचे ते सहसंस्थापक होते. ‘डिजीटल क्रांतीचे ते पितामह’ म्हणून ते गणले गेले.१८८७ साली विस्कन्सीन-मेडिसीन विद्यालयातून फ्रँक लॉईड राईट यांना बाहेर पडावे लागले. नोकरीसाठी ते शिकागोला गेले. राईट हे रचनाकार, लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. तत्वज्ञानावर त्यांचा विश्वास होता. त्यांना ‘आॅर्गेनिक आर्किटेक्चर’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी १००० हून अधिक रचना केल्या आणि ५३२ कामे पूर्ण केली. फॉलिंगवॉटर, गनिंगहम म्युझियम, रॉकरी बिल्डींग, पार्क इन हॉटेल, टेलिसन याची निर्मिती त्यांनी केली आहे. अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट रचनाकार म्हणून १९९१ साली त्यांना गौरविण्यात आले.हावर्ड विद्यापीठात दुसºया वर्षात शिकत असताना त्यांना सिलीकॉन व्हॅलीकडे जाऊन फेसबुकवर काम करावयाचे असल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागले. सामाजिक माध्यम असलेल्या फेसबुकचे ते सहसंस्थापक. फेसबुकचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी फेसबुकला जगातील सर्वात मोठे आणि यशस्वी नेटवर्क म्हणून पुढे आणले. टाईम मॅगेझीनने त्यांना ‘पर्सन आॅफ द इअर’ म्हणून गौरविले. २०१३ साली त्यांच्याकडे १६८ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती होती.महाविद्यालयीन जीवनात एका मुलीसोबत आढळल्याने ब्राऊन विद्यापीठातून टेड टर्नर यांची हकालपट्टी झाली. टर्नर हे जगातील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. अमेरिकेतील सर्वाधिक खासगी जमीन असणारे म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सर्वात प्रथम २४ तास चालणारी वृत्तवाहिनी सीएनएनची स्थापना केली. कार्टून नेटवर्क सुरु केल्याने ते लहान मुलांचे सर्वात आवडते आहेत.डब्ल्यूटीएफव्ही-टीव्हीमध्ये अँकर म्हणून काम केल्याबद्दल ओपेरा विन्फ्रे यांना १९७६ साली टेनेन्सी राज्य विद्यापीठातून बाहेर पडावे लागले. १९८६ साली त्यांनी पदवी पूर्ण केली. विन्फ्रे या माध्यम चालक, टॉक शो चालविणाºया, अभिनेत्री, निर्माती आणि समाजसेवी म्हणून लोकप्रिय आहेत. २०१२ साली त्यांचे उत्पन्न २७ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके होते. २० व्या शतकातील श्रीमंत अमेरिकन यादीमध्ये त्यांचा समावेश आहे. ओपेरा विन्फ्रे शो हा जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा शो आहे.ओहिओ प्रांतातील ग्रेट लेक्स थिएटर फेस्टीव्हलमध्ये संधी आल्यानंतर टॉम हँन्क्स यांनी सॅक्रॅमेन्टो स्टेटस् म्हणून बाहेर पडावे लागले. चित्रपटात त्यांनी केलेल्या अद्वितीय भूमिकेमुळे लाखो लोक त्यांचे चाहते आहेत. एकापाठोपाठ एक म्हणजे फिलाडेल्फिया (१९९३) आणि फॉरेस्ट गम्प (१९९४) असे सलग दोन वर्षे आॅस्कर मिळविणारे ते एकमेव आहेत. समीक्षक, व्यावसायिक चित्रपटातून त्यांनी यश मिळविले.