प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता अल पचीनो काही महिन्यांपूर्वीच चौथ्यांदा बाबा झाला आहे. ८३ वर्षीय अल पचीनो याच्या २९ वर्षीय गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाह हिने तीन महिन्यांपूर्वी एका बाळाला जन्म दिला. मात्र, या बाळाच्या जन्मानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्येच ही जोडी विभक्त झाली आहे. त्यामुळे आता नूरने लॉस एंजेलिसमध्ये कायदेशीर कागजपत्रे दाखल करुन तिने तिच्या मुलाची कस्टडी मिळण्याची मागणी केली आहे.
'द ब्लास्ट'च्या वृत्तानुसार, नूरने मुलाची कस्टडी मागण्यासोबतच वाजवी कारण असेल तरच अल पचीनो यांना मुलाला भेटण्याची परवानगी द्यावी अशीही इच्छा व्यक्त केली आहे. नूरने 'पालकत्वाची स्वैच्छिक घोषणा' नावाचा एक दस्तऐवज न्यायालयात दिला आहे. या दस्तऐवजावर त्यांच्या बाळाच्या जन्मानंतर सहा दिवसानंतर नूर आणि अली या दोघांनी सह्या केल्या होत्या. तसंच एका साक्षीदारानेही सही केली आहे. त्यामुळे या बाळाचे वडील अल पचीनोच असल्याचं त्यांनी कबूल केलं आहे.
दरम्यान, नूर व अल एप्रिल २०२२ पासून एकमेकांना डेट करत आहेत. अल यांचे आतापर्यंत हाय-प्रोफाइल रिलेशनशिप्स राहिले आहेत. परंतु, त्यांनी कधीच कोणत्या महिलेशी लग्न केलं नाही. ‘सेंट ऑफ ए वुमन’, ‘हीट’, ‘सर्पिको’, ‘सी ऑफ लव’, ‘द डेविल्स एडवोकेट’, ‘द इनसाइडर’ अशा अनेक गाजलेल्या सिनेमा त्यांनी काम केलं आहे. नूरपूर्वी ते जन टॅरंट हिला डेट करत होते. जन आणि अल यांना ३३ वर्षाची जुली मॅरी नावाची एक मुलगीदेखील आहे. तसंच बेवर्ली डी एंजेलो हीदेखील त्यांची गर्लफ्रेंड होती. तिला दोन जुळी मुलं आहेत.