एकेकाळी पॉर्नस्टार म्हणून ओळखली जाणारी ब्रिटिनी द लो मोरा आता धर्मप्रचारक बनली आहे. अॅडल्ट इंडस्ट्रीत तिला जेना प्रेस्ले नावाने ओळखले जायचे. सहा वर्षांपूर्वी तिने अॅडल्ट इंडस्ट्री कायमची सोडली आणि आता ती धर्मप्रचारक बनली आहे. कॅलिफोर्नियात १ एप्रिल १९८७ रोजी जन्मलेल्या जेनाने स्ट्रिप डान्सर म्हणून करिअरची सुरूवात केली. यानंतर नशा आणि नाईटक्लब हेच तिचे आयुष्य बनले. २००५ मध्ये तिने अॅडल्ट इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यावेळी तिचे वय केवळ १८ वर्षे होते़.ड्रग्जच्या आहारी गेलेली जेना नाईट क्लबमध्ये फेमस झाली आणि तिला अॅडल्ट चित्रपटाच्या आॅफर्स येणे सुरु झाले. जेनाने ३०० पेक्षा अधिक अॅडल्ट फिल्म्समध्ये काम केले आहे. २०११ मध्ये झालेल्या १०० हॉटेस्ट पॉर्न स्टारमध्ये ती १७ व्या स्थानावर होती. तिने प्रचंड संपत्ती कमावली. लक्झरी गाड्या, अलिशान बंगले असे सगळे काही. पण यादरम्यान जेना व्यसनांच्या इतकी आहारी गेली एक वेळ अशीही आली की, तिच्याकडे घराचे भाडे द्यायलाही पैसे नव्हते. जेनाची ही स्थिती बघून, तिची आजी तिला आपल्यासोबत लॉस एंजिल्सला घेऊन गेली. आजीने जेनाचा अतिशय प्रेमाने सांभाळ केला आणि २०१२ मध्ये जेनाने अॅडल्ट इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
यादरम्यान चर्चमधील एक पादरी रिचर्ड डी ला मोरा याच्यासोबत तिची ओळख झाली. जेना मनातल्या मनात त्याच्यावर प्रेम करू लागली. यानंतर २०१६ मध्ये दोघांनीही लग्न केले. या दोघांनी एकत्र एक पुस्तकही लिहिले. आता जेनाही धर्मप्रचारक झाली आहे आणि तिचा पती रिचर्ड तिच्या या निर्णयाने प्रचंड आनंदी आहे.