एगहेड्स क्विज शोचा स्टार सीजे डि मूई गेल्या कित्येक वर्षांपासून एड्स या आजाराने पी़डित आहे आणि आता त्याच्याकडे पैशांची कमतरता असल्यामुळे त्याला घर गहाण ठेवावे लागले आणि ते घर वाचवण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे. डॉट युकेच्या रिपोर्टनुसार, ४९ वर्षीय सीजे एका जमान्यात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शोचा परीक्षक होता आणि त्या काळी तो टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध व्यक्ती होता. २००६ साली एका व्यक्तीने त्याच्यावर हत्या केल्याचा खोटा आरोप केल्यामुळे त्याला शोमधून काढून टाकण्यात आले होते.
१९८८ साली सीजे डी मूईवर एम्स्टर्डममधील एका बेघर व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या प्रकरणात त्याला आर्थिक व मानसिकरित्या सामोरे जावे लागले होते. मात्र त्याच्यावरील आरोप मागे घेण्यात आले होते. पण, या सर्व गोष्टींमुळे त्याची अवस्था बिकट झाली होती. त्याला त्याचे घर गहाण ठेवावे लागले होते. त्यावेळी त्याच्या मदतीसाठी एक क्राऊड फंडींग मोहिम करण्यात आली होती.
सीजे डी मूईने नुकतेच एक ट्विट केले आहे त्यात त्याने म्हटले की, त्याला वयाच्या १८ व्या वर्षी एड्सची लागण झाली होती. त्यावेळी मी सेक्स वर्कर म्हणून काम करत होतो. मला या गोष्टीची अजिबात लाज वाटत नाही. कारण मला जगण्यासाठी असे करावे लागले.
डिस्क्लेमर ः आधी दिलेल्या बातमीत सीजे डी मूई बेघर झाल्याचे म्हटले होते. मात्र लोकमतने केलेल्या पडताळणीनंतर असे निष्पन्न झाले की सीजेने घर गहाण ठेवले असून तो व त्याचा मित्र जो त्याचे घर वाचवण्यासाठी प्रयत्न करतो आहे.