Join us

Video : गरोदर असतानाच आलियाने केला हॉलिवूड सिनेमा, वाळवंटात तर कधी हवेत केले स्टंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 08:54 IST

आलियाने प्रेग्नंसीबाबत हॉलिवूड निर्मात्यांना सांगितलं तेव्हा...

अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhat) पहिला हॉलिवूड सिनेमा 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart Of Stone) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. 'वंडर वुमन' गॅल गॅडोट (Gal Gadot) आणि जेमी डॉर्मनसोबत (Jamie Dorman) ती झळकली. आलियाने पहिल्याच हॉलिवूड सिनेमात खलनायिकेची भूमिका साकारली असून जबरदस्त स्टंटही केले आहेत. आश्चर्य म्हणजे अभिनेत्रीने हे स्टंट्स गरोदर असतानाच केलेत त्यामुळे तिचं विशेष कौतुक होतंय. 

आलिया आणि रणबीर कपूर एप्रिल महिन्यात लग्नबंधनात अडकले. तर नोव्हेंबर महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. आलिया लग्नाआधीच प्रेग्ंनंट होती. शिवाय ती चार महिन्यांची गरोगर असतानाच तिने 'हार्ट ऑफ स्टोन' चं शूट केलं. यामध्ये ती कधी वाळवंटात तर कधी हवेत फाईट सीन करताना दिसत आहे. तिचे अधिकतर सीन्स हे गॅल गॅडोटसोबत आहेत. आलियाने सिनेमात हॅकर केया धवनची भूमिका साकारली आहे. सध्या तिच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

प्रेग्नंसीबाबत निर्मात्यांना सांगितलं तेव्हा...

आलियाचा हा पहिलाच हॉलिवूड सिनेमा असल्याने ती खूप उत्सुक होती. मात्र प्रेग्नंसीबद्दल कळताच काही निर्बंध तर येणारच हे तिला कळलं. गॅल गॅडोट स्वत: सिनेमाची निर्माती होती म्हणून आलियाने आधी तिला प्रेग्नंसीविषयी सांगितलं. गॅल काय प्रतिक्रिया देईल याची आलिया धाकधूक होती. मात्र गॅलने उलट तिचं अभिनंदन केलं आणि हे तर आपल्या चित्रपटासाठी खूप लकी ठरेल असं ती म्हणाली. यामुळे आलिया खुश झाली. तिचं खूप चांगल्या पद्धतीने सेटवर स्वागत झालं.

टॅग्स :आलिया भटहॉलिवूडबॉलिवूडप्रेग्नंसी